थलापती विजयची १०वीची मार्कशिट व्हायरल, गणितात मिळालेले फक्त 'इतके' गुण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 19:34 IST2026-05-08T19:11:44+5:302026-05-08T19:34:00+5:30
तमिळनाडूचा किंगमेकर आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजयचा १० वीचा निकाल चर्चेत आला आहे.

आज ८ मे रोजी दहावी परीक्षेचा निकाल लागला आहे. कुणी चांगले गुण घेऊन पास झालंय. तर कुणी नापास झालंय.

पण निकाल काहीही लागला तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची मार्कशिट तुमचं भविष्य ठरवू शकत नाही. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा 'थलापती' आणि तमिळनाडूचा किंगमेकर अर्थात विजय.

नुकताच विजयचा १०वीचा निकाल सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. आज कोट्यवधींच्या हृदयावर राज्य करणाऱ्या या सुपरस्टारचा शैक्षणिक प्रवास कसा होता? जाणून घेऊया.

विजय अभ्यासात खूप हुशार किंवा 'टॉपर' नव्हता, तर तो एक सरासरी विद्यार्थी होता.

विजयने १९८९ मध्ये आपली १०वीची परीक्षा पूर्ण केली. विजयने त्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण चेन्नईतील फातिमा मॅट्रिक्युलेशन हायर सेकंडरी स्कूल आणि बाललोक मॅट्रिक्युलेशन हायर सेकंडरी स्कूल इथून पूर्ण केले.

विजयच्या गुणपत्रिकेत सर्वात धक्कादायक आणि चर्चेचा विषय म्हणजे त्याचे गणितातील गुण. ज्या विजयने आज राजकारणात मोठमोठ्या धुरंधरांचे 'गणित' बिघडवून टाकले आहे, त्याला स्वतःला १०वीत गणितात सर्वात कमी गुण मिळाले होते.

गणित हा त्यांचा सर्वात कमकुवत विषय ठरला. गणितात त्याला फक्त २०० पैकी ९५ गुण मिळाले होते.

विजयनं गणित किंवा विज्ञानापेक्षा तमिळ आणि इतर विषयांमध्ये चांगले गुण मिळवले होते.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मार्कशिटनुसार विजयला दहावीत तमिळ: १५५/२००, इंग्रजी: १३३/२००, विज्ञान: २०६/३००, समाजशास्त्र: १२२/२००, गणित: ९५/२०० असे गुण मिळाले होते.

१२वी पूर्ण केल्यानंतर विजयने चेन्नईच्या नामांकित लोयोला कॉलेजमध्ये 'व्हिज्युअल कम्युनिकेशन'साठी प्रवेश घेतला. मात्र, अभिनयाच्या ओढीमुळे त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले नाही.

विजयनं औपचारिक पदवी पूर्ण केली नसली तरी चित्रपट क्षेत्रातील त्याच्या योगदानाची दखल घेत 'डॉ. एम.जी.आर. एज्युकेशनल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट'ने त्याला मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे.
















