कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 13:38 IST2026-04-24T13:33:05+5:302026-04-24T13:38:51+5:30

Raja Shivaji Movie: जिनिलियाला राणी सईबाईंच्या भूमिकेत पाहून चाहते थक्क, म्हणाले- "नजरच काढायला हवी..."

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. या सिनेमात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

या सिनेमात बॉलिवूडची तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. संजय दत्त, विद्या बालन, फरदीन खान, बोमन इराणी, अभिषेक बच्चन यांच्या मुख्य भूमिका आहेत.

पण, लक्ष वेधून घेतलं ते राणी सईबाईंच्या भूमिकेत असलेल्या महाराष्ट्राच्या लाडक्या वहिनी जिनिलिया देशमुख हिने.

'राजा शिवाजी'च्या ट्रेलरमध्ये जिनिलीयाची सईबाईंच्या भूमिकेतील झलक पाहायला मिळाली. जिनिलीयाला सईबाईंच्या लूकमध्ये पाहून चाहतेही थक्क झाले.

नऊवारी साडी, कपाळी चंद्रकोर अन् डोळ्यांत छत्रपती शिवरायांसाठी प्रेम आणि आदराची भावना असलेल्या राणी सईबाईंची झलक ट्रेलरमध्ये दिसली.

सोशल मीडियावर जिनिलियाचं चाहते कौतुक करत आहेत. 'राजा शिवाजी'मध्ये जिनिलीयाला सईबाईंच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

जिनिलियाच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. "जिनिलिया वहिनींची नजर काढा, सुंदर दिसत आहेत", "जिनिलीयाला सईबाईंच्या भूमिकेत पाहणं म्हणजे सौंदर्य आणि शक्ती यांचा मिलाप...", अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.

अमृता खानविलकरनेही जिनिलीयाच्या फोटोंवर कमेंट करत "राणीसाहेब" असं म्हटलं आहे.

'राजा शिवाजी' सिनेमाचं दिग्दर्शन रितेश देशमुखने केलं असून येत्या १ मे रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.