फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 15:10 IST2025-05-11T14:11:08+5:302025-05-11T15:10:50+5:30

हा प्रसिद्ध कलाकार सर्वसामान्य माणसांच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून हॉटेलमध्ये फक्त ४० रुपयांना भरपेट जेवण सर्वांना देत आहे. सर्वांनी त्याचं कौतुक केलंय

फोटोमधील हे हॉटेल दिसतंय. या हॉटेलमध्ये फक्त ४० रुपयांना पोटभर जेवण मिळतं. विशेष म्हणजे एका बॉलिवूड कलाकाराने हे हॉटेल उघडलंय.

या कलाकाराचं नाव आहे अरिजीत सिंह. अरिजीत हा बॉलिवूडमध्ये त्याच्या श्रवणीय गाण्यांमुळे चांगलाच लोकप्रिय आहे.

अरिजीत विविध ठिकाणी त्याच्या म्यूझिक कॉन्सर्ट करत असतो. अरिजीत ग्लॅमरच्या दुनियेत वावरत असला तरीही रिअल लाईफमध्ये तो साधं राहणीमान पसंत करतो.

अरिजीत कोणत्याही बॉलिवूड पार्ट्यांमध्येही दिसत नाही. याशिवाय तो गुपचूप समाजसेवा करत असतो.

अरिजीतने उघडलेलं हॉटेल हेशेल हे त्याच्या अशाच दानशूर स्वभावाचं प्रतीक आहे. अरिजीतचं मूळ घर जिथे आहे अशा पश्चिम बंगाल राज्यातील मुर्शिदाबादमधील जियागंज भागात हे हॉटेल आहे.

फक्त ४० रुपयांमध्ये हॉटेल हेशेलमध्ये लोकांना जेवण मिळतं. जेवण स्वस्तात मिळत असलं तरी पदार्थांची चव मात्र स्वादिष्ट आहे, असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे.

अरिजीतने स्वतः कधीच त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या हॉटेलचं प्रमोशन केलं नाही. एखादं चांगलं काम करताना या हाताचं त्या हाताला कळू द्यायचं नाही, ही गोष्ट अरिजीत त्याच्या वैयक्तिक आयुष्यात पाळताना दिसतो