सुकन्या समृद्धी योजना आणि PPF; जाणून घ्या कुठे मिळणार तुम्हाला उत्तम रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 03:10 PM2021-09-24T15:10:35+5:302021-09-24T15:15:39+5:30

Sukanya Samriddhi Vs. PPF : मुलींच्या भविष्याकडे पाहता केंद्र सरकारकडून सुकन्या समृद्धी योजनेची सुरूवात करण्यात आली आहे.

आजही भारतात मुलांचं शिक्षण आणि त्यांच्या लग्नावर आई-वडिल अधिक खर्च करताना दिसतात. म्हणून बहुतांश पालकांचा कल हा अशा गुंतवणूकीत असतो ज्यातून अधिक परतावा मिळेल. केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना ही अशीच एक लोकप्रिय योजना आहे. ही योजना मुलींच्या भविष्याकडे पाहून सुरू करण्यात आली आहे.

तर पाहूया पब्लिक प्रोविडेंट फंड आणि सुकन्या समृद्धी योजना यातील सर्वाधिक फायद्याची कोणती स्कीम आहे. काही जाणकारांच्या मते सुकन्या समृद्धी योजनेत सर्वच पैसा गुंतवणं योग्य ठरणार नाही. तर त्यातील काही पैसा हा पीपीएफ मध्येही गुंतवला पाहिजे.

सुकन्या समृद्धी योजनेत आपल्याला ७.६ टक्क्यांचं व्याज मिळतं. तर पीपीएफवर ७.१ टक्क्याचं व्याज मिळतं. हे व्याज दर चार महिन्यांनी रिवाईज केलं जातं. जेव्हा पीपीएफ किंवा सुकन्या समृद्धी योजना यापैकी कोणतीही एखादी योजना निवडायची असेल तर तुम्ही सुकन्या समृद्धी योजना निवडू शकता.

कारण पीपीएफच्या तुलनेत यात अधिक परतावा मिळतो. जर तुम्ही पीपीएफमध्ये १५ वर्षांसाठी गुंतवणूक करता तर त्यातून तुम्हाला चांगला पर्याय मिळू शकतो. त्यामुळे थोडी थोडी गुंतवणूक दोन्ही योजनांमध्ये करणं उत्तम आहे.

पीपीएफमधील गुंतवणूक सर्वांच्याच पसंतीची आहे कारण यात तुम्हाला सरकारी गॅरंटी मिळते. यात करावरही सूट मिळते.

आयकर अधिनियमच्या कलम ३७० सी अंतर्गत तुम्हाला दीड लाखांपर्यंत गुंतवणूकीवर सूट मिळते. दोन्ही योजना या टपाल खात्याकडून चालवल्या जातात.

याव्यतिरिक्त ज्या बँकेमध्ये पब्लिक प्रोविडेंट फंड सुरू करण्याचा पर्याय उपलब्ध असतो त्या बँकेत तुम्हाला सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्याचाही पर्याय मिळतो.

पीपीएफ अकाऊंटची मॅच्युरिटी १५ वर्षांची असते. परंतु ती पाच-पाच वर्षांनी वाढवली जाऊ शकते. तर दुसरीकडे सुकन्या समृद्धी योजनेची मॅच्युरिटी २१ वर्षांची आहे. परंतु या पालकांना केवळ १४ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते.

या योजनेमध्ये वर्षाला कमीतकमी २५० रूपये आणि जास्तीतजास्त दीड लाख रूपये गुंतवता येतात. तर पीपीएफमध्ये वर्षाला कमीतकमी ५०० रूपये आणि जास्तीतजास्त दीड लाख रूपये गुंतवता येतात.