SBIच्या 'या' स्कीमने एका आठवड्यात FD पेक्षा दुप्पट, तर 6 महिन्यात दिला 50% नफा; आपणही मिळवू शकता लाभ

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 7, 2021 09:25 AM2021-02-07T09:25:06+5:302021-02-07T09:44:32+5:30

आजही सर्वांना बँकांच्या एफडीमध्ये पैसे ठेवणे अधिक सुरक्षित वाटते. मात्र, सध्या सरकारी आणि खासगी क्षेत्रातील बँकाही केवळ 6 टक्केच व्याजदर देत आहेत. यामुळे आता गुंतवणूकदार अधिक नफा मिळविण्यासाठी म्युचूअल फंडमध्ये पैशांची गुंतवणूक करत आहेत.

काही दिवसांपूर्वी असोसिएशन ऑफ म्यूचुअल फंड्स इन इंडियाकडून (AMFI) जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, 2020मध्ये एकूण फोलिओची (म्युचूअल फंडात उघडण्यात आलेल्या खात्यांना फोलिओ म्हणतात.) संख्या 9.43 कोटींच्याही पुढे गेली आहे.

2019 मध्ये म्यूचुअल फंड उद्योगाने 68 लाख फोलिओ जोडले होते.

तज्ज्ञांच्या मते या काळात बँकिंग सेक्टरच्या SBI Banking & Financial Services Fund मध्ये पैसे लाऊन चांगला नफा मिळवला जाऊ शकतो. कारण येथे एका आठवड्यात 12 टक्कते आणि 6 महिन्यात 52 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळत आहेत.

एखाद्याने गेल्या आठवड्यात 10 हजार रुपये यात गुंतवले असते, तर त्याला या आठवड्यात 11,162 रुपये मिळाले असते. तसेच 6 महिन्यांपूर्वी एखाद्याने पैसे गुंतवले असते, तर त्याला आता 15,287 रुपये मिळाले असते.

...म्हणून बँकिंग सेक्टरमध्येच करायला हवी गुंतवणूक - अर्थसंकल्पानंतर स्थानिक शेअर बाजारातील महत्वाचे बेंचमार्क इंडेक्स सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये विक्रमी तेजी दिसून येत आहे. यात बँकिंग शेअरमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे.

जग भरातील रेटिंग एजन्सिजचे म्हणणे आहे, की बँकिंग शेअर्समध्ये अशाच प्रकारची तेजी सुरू राहील. अशात आपल्याकडे चांगला नफा मिळविण्याची संधी आहे.

तज्ज्ञांच्या मते, अर्थसंकल्पात झालेल्या काही घोषणांमुळे बँकिंग सिस्टममध्ये वेगाने सुधारणा होईल. यामुळेच बीएसईच्या बँकिंग इंडेक्सने एका दिवसात 9 टक्क्यांची उसळी घेतली.

म्‍यूच्युअल फंड्सचा विचार करता, बँकिंग सेक्‍टर फंड्सने एका दिवसात 7.63 टक्के रिटर्न्स दिले आहेत. तर, वर्षभरातील खराब स्थितीनंतर, गेल्या तीन महिन्यांत या स्‍कीम्सनी 40 टक्के रिटर्न्स दिले आहेत.

म्‍यूचुअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांच्या मते, येणाऱ्या काळात बँकिंग म्युचूअल फंड्सशी संबंधित योजनांमध्ये लवकर पैसे दुप्पट होण्याची संधी आहे.

अशा प्रकारच्या गुंतवणुकीतून आपणही लाभ मिळवू शकता.