सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 14:18 IST2026-04-17T14:11:33+5:302026-04-17T14:18:44+5:30
एसीमुळे कारचे मायलेज कमी होते, या भीतीने अनेकजण वारंवार एसी सुरू-बंद करतात. मात्र, हे खरोखरच फायदेशी आहे की धोकादायक? जाणून घेऊया...

उन्हाळ्याचा तडाखा सातत्याने वाढताना दिसत आहे. यामुळे कारमधील एसी (AC) आता एक गरज बनली आहे. मात्र, एसीमुळे कारचे मायलेज कमी होते, या भीतीने अनेकजण वारंवार एसी सुरू-बंद करतात. मात्र, हे खरोखरच फायदेशी आहे की धोकादायक? जाणून घेऊया...

तज्ज्ञांच्या मते, एसीचा संबंध थेट इंजिनशी असतो. जेव्हा आपण एसी चालू करतो, तेव्हा इंजिनवर अतिरिक्त ताण पडतो आणि इंधनाचा वापर साधारणपणे ४ ते ७ टक्क्यांनी वाढतो.

मात्र, वारंवार एसी ऑन-ऑफ केल्याने मायलेजमध्ये कुठल्याही प्रकारचा फारसा मोठा फरक पडत नाही अथवा फारशी इंधन बचतही होत नाही. यामुळे उलट कंप्रेसरवर ताण येऊन कुलिंग सिस्टमच खराब होण्याचा धोका वाढतो.

खिडक्या उघड्या ठेवून गाडी चालवता? - अनेक ड्रायव्हर्स इंधन वाचवण्यासाठी एसी बंद करून खिडक्या उघड्या ठेवतात. पण खरेतर, ताशी ३० किमी पेक्षा जास्त वेगाने गाडी चालवताना खिडक्या उघड्या ठेवणे इंधन बचतीऐवजी तोट्याचे ठरते. रनिंगमध्ये बाहेरच्या हवेचा दाब कारला मागे ढकलतो.

यामुळे कार पुढे नेण्यासाठी इंजिनला अधिक जोर लावावा लागतो आणि इंधन जास्त जळते. शहरात ट्रॅफिक, वारंवार ब्रेक आणि स्टार्टमुळे एसीचा परिणाम अधिक जाणवतो. तसेच, हायवेवर सातत्याने स्पीडमध्ये असल्याने हा परिणाम अधिक जाणवतो.

कारचे इंधन वाचवण्यासाठी एसी वारंवार बंद करण्याऐवजी, कारमधील तापमान थंड झाल्यावर सेटिंग कमी करणे हा उत्तम पर्याय आहे.

असे वाढेल मायलेज? - इंजिनच्या ऊर्जेवर चालणाऱ्या एसी कंप्रेसरची कार्यक्षमता टिकवण्यासाठी वेळोवेळी सर्व्हिसिंग करणे गरजेचे आहे. यासोबतच टायरमधील योग्य हवा आणि संयमित ड्रायव्हिंगमुळे कारचे मायलेज उत्तम राखण्यास मदत होते.
















