महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांसाठी शुक्रवारी (दि.१७) बोलावली बैठक पुढे ढकलण्यात आली असून, बैठकीची निवडणुकीसाठीची सुधारित तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने प्रसिद्ध ...
पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी चालू वर्षातील पहिली पल्स पोलिओ मोहीम येत्या रविवारी (दि.१९) संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार असून, या मोहिमेदरम्यान सुमारे साडेचार लाख बालकांना डोस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. रविवारी त्यासाठी जागोजागी ...
एक ते दीड वर्षांपासून जाखोरी शिवारात बिबट्याचे दर्शन होत असल्याने परिसरात बिबट्याची दहशत असताना शुक्रवारी (दि.१७) सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. ...
रायपूर शिवारात शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात औषधोेपचार करून अधिक उपचारासाठी नाशिकला रवाना केले. त्यांची प्रकृती सुधारत असून, याप्रकरणी चांदवड पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. ...
थंडीची तीव्रता पुन्हा वाढली असून, शुक्रवारी यंदाच्या मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. निफाड तालुक्यात किमान तापमान २.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले असून, परिसर थंडीने गारठला आहे. ...
गेल्या वर्षभरात शहर व परिसरात घडलेल्या २२५ आगीच्या घटनांमध्ये सुमारे ७ कोटी २९ लाख ९८ हजारांची मालमत्ता जळून खाक झाली आहे, तर अग्निशमन दलाने आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवित ३९ कोटी ८४ लाख २६ हजारांची मालमत्ता वाचवण्यात यश मिळविले आहे. ...
मालेगाव शहराची सध्याची व भविष्याची पाणीटंचाई दूर करण्यासाठी गिरणातून ४०० दलघफू पाणी, तर चणकापूर धरणामधूम एक आवर्तन वाढवून द्यावे, अशी मागणी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केली आहे. ...