The search for the suspect in the shootings continues | गोळीबारातील संशयित आरोपीचा शोध सुरू

गोळीबारातील संशयित आरोपीचा शोध सुरू

मालेगाव : शहरालगतच्या भायगाव शिवारातील संविधाननगरमध्ये राहणाऱ्या ज्योती भटू डोंगरे (३६) या महिलेवर गोळीबार करणाºया संशयित आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास संविधाननगरमध्ये अज्ञात व्यक्तीने डोंगरे यांच्यावर गोळीबार करून पळ काढला. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथके रवाना झाली आहेत. याप्रकरणातील संशयास्पद व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले जात आहे; मात्र मुख्य संशयित आरोपीचे धागे-दोरे पोलिसांना मिळत नाहीत. वडनेर खाकुर्डीचे पोलीस पथकही संशयित आरोपीचा शोध घेत आहेत.

Web Title:  The search for the suspect in the shootings continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.