जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत रविवारी (दि. ९) ३००२ रुग्णांची वाढ झाली. ३०२५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. ४० रुग्णांचा बळी गेल्याने बळींची संख्या ३,८६५वर पोहोचली आहे. ...
ग्रामपंचायतीकडे शासनाकडून वर्ग होणाऱ्या वित्त आयोगाचा निधी त्याचबरोबर ग्रामनिधीची रक्कम सरपंचाला हाताशी धरून मित्रांच्या नावे धनादेशाद्वारे टाकून आशेवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने लाखो रुपयांचा अपहार केला असल्याचे, लेखा परीक्षणातून निष्पन्न झाले ...
मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान पर्व सध्या अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. रविवारी (दि.९) या पर्वाचा २६ वा उपवास (रोजा) समाजबांधवांनी पूर्ण केला. यानंतर संध्याकाळचे नमाज पठण पार पडल्यानंतर ‘शब ए कद्र’ला प्रारंभ झाला. यानिमित्ताने घरोघरी पारंपरिक पद्धती ...
अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांच्या भरती प्रक्रियेतील वयोमर्यादेची अट २१ ते ३० ऐवजी २१ ते ४० करण्यात यावी, अशी मागणी महिला व बालकल्याण सभापती अश्विनी अनिल आहेर यांनी राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे केली ...
नांदूर वैद्य : इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी येथे एका घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने घरातील सर्व वस्तू तसेच घराच्या कामासाठी ठेवलेली पाच लाखांची रोख रक्कम, चार तोळे सोने व संसारोपयोगी साहित्य आगीत जळून भस्मसात झाले. ...
निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निऱ्हाळे फत्तेपूर येथे शुक्रवारी आलेल्या बिबट्याला अद्यापही पिंजरा न दिल्याने शेतकरी भयभीत असलेल्यांचे मोहन काकड यांनी सांगितले. ...
घोटी : हिंदुस्तानचे आराध्यदैवत, देशातील पहिला स्वातंत्र्यसैनिक महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त इगतपुरी तालुक्यातीलच प्रसिद्ध त्रिंगलवाडी या ऐतिहासिक किल्ल्यावर प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. ...