Top Marathi News Live: कुणाची नजर लागली माहित नाही, पण दादांसारखा नेता नियतीने हिरावून नेला: जयंत पाटील

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 17:53 IST2026-02-23T08:55:54+5:302026-02-23T17:53:13+5:30

महाराष्ट्रासह देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

Maharashtra Marathi News Live Updates 23 February 2026: Maharashtra assembly Budget Session, Vidhan Sabha Adhiveshan, CM Devendra Fadnavis, Ajit Pawar, NCP Sharad Pawar, Sunetra Pawar, t20 world cup, PM Narendra Modi | Top Marathi News Live: कुणाची नजर लागली माहित नाही, पण दादांसारखा नेता नियतीने हिरावून नेला: जयंत पाटील

Top Marathi News Live: कुणाची नजर लागली माहित नाही, पण दादांसारखा नेता नियतीने हिरावून नेला: जयंत पाटील

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात जोरदार सामना रंगण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. अर्थखाते सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने यंदाचा अर्थसंकल्प ते सादर करणार आहेत. मधल्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही वेगळी राजकीय समीकरणे पाहायला मिळाली. त्याचे या अधिवेशनात काय, कसे पडसाद उमटतात, हे पाहावं लागेल. आंतरराष्ट्रीय राजकारणात, अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढताना दिसतो आहे. त्यामुळे युद्धाचे ढग अधिक गडद झाले आहेत. क्रिकेटच्या मैदानात टीम इंडियाने मोक्याच्या क्षणी हाराकिरी केल्याने टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत आता 'करो या मरो'ची परिस्थती आहे. 

LIVE

Get Latest Updates

23 Feb, 26 : 05:52 PM

भाजपा आमदाराने केला भ्रष्टाचाराचा पर्दाफाश

उत्तर प्रदेशच्या फत्तेपूर जिल्ह्यातील खागा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार कृष्णा पासवान यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर पाऊल उचलत बांधकाम सुरू असलेला डांबरी रस्ता चक्क फावड्याने खोदला. ही घटना तेव्हा घडली जेव्हा आमदार आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर होत्या आणि ग्रामस्थांनी अइमापूर ते रतनपूर दरम्यान बनवल्या जाणाऱ्या २२०० मीटर रस्त्याच्या कामात घोटाळा होत असल्याची तक्रार केली. वाचा सविस्तर

23 Feb, 26 : 04:16 PM

परिवहन समिती सदस्य निवडीवरून महासभेत संघर्ष

नवी मुंबई: महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती सदस्य निवडीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये संघर्ष झाला. तौलनिक संख्याबळाच्या बळावर सदस्य न निवडल्यामुळे शिंदेसेनेने तीव्र निषेध केला. यामुळे सभागृह तहकूब करण्यात आले. वाचा सविस्तर

23 Feb, 26 : 04:10 PM

बाथरूमच्या फलकावर छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी पद्मिनी यांचा फोटो; देशभरात संतापाची लाट

हरयाणातील सिक्री येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. सिक्री येथील एका बँक्वेट हॉलमधील प्रसाधनगृहांबाहेर दिशादर्शक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी पद्मिनी यांचा फोटो लावण्यात आल्याचे समोर आले आहे. पुरुष आणि महिला प्रसाधनगृहांबाहेर हे फोटो लावले आहेत. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. हा प्रकार पाहून नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि इतिहासप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. (सविस्तर वाचा)

23 Feb, 26 : 03:47 PM

कुणाची नजर लागली माहित नाही, पण दादांसारखा नेता नियतीने हिरावून नेला: जयंत पाटील

दादांसारखा नेता नियतीने हिरावून नेला. कुणाची नजर लागली काही माहित नाही. पण, महाराष्ट्राच्या राजकारणाला नजर लागली आणि दादांसारखा नेता आपल्यातून गेला. महाराष्ट्र राज्यात मोठ्या अपेक्षेने ज्यांच्याकडे बघितले जाते, त्यांनाच हिरावून घेण्याची नियतीची पद्धत आहे का, अशी शंका येत असल्याच्या भावना जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

23 Feb, 26 : 03:38 PM

अनुष्ठा पाटोळे प्रकरणी दोषींवर कारवाईसाठी सरणावर बसून आमरण उपोषण

लातूर जिल्ह्यातील टाका येथील अनुष्ठा पाटोळे हिने आत्महत्या केलेली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप करत या प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. संबंधित प्रकरणात नवोदय विद्यालयातील मुख्याध्यापकांसह काही शिक्षकांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाकडाच्या सरणावर बसून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. गणपत कांबळे यांनी हे उपोषण सुरू केले असून अनुष्ठा पाटोळे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

23 Feb, 26 : 03:24 PM

नवी मुंबई : परिवहन समिती सदस्य निवडीवरून महासभेत संघर्ष

नवी मुंबई: महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती सदस्य निवडीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये संघर्ष झाला. तौलनिक संख्याबळाच्या बळावर सदस्य न निवडल्यामुळे शिंदेसेनेने तीव्र निषेध केला. यामुळे सभागृह तहकूब करण्यात आले.

नवी मुंबई महानगर पालिका परिवहन समितीवर १२ सदस्य निवडीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. सभागृहनेते सागर नाईक यांनी तौलनिक संख्याबळाऐवजी मतदानाद्वारे सदस्य निवडीचा मुद्दा मांडला. विरोधीपक्षनेते विजय चौगुले,  शिवराम पाटील,  किशोर पाटकर यांनी या प्रक्रियेला आक्षेप घेतले. 

23 Feb, 26 : 02:58 PM

विधानसभेत शोक प्रस्ताव मांडताना देवेंद्र फडणवीस भावुक

 राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (सोमवार) सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या प्रथेप्रमाणे पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या सदस्य असलेल्या दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहण्यासाठी शोक प्रस्ताव मांडण्यात आला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी शोक प्रस्ताव मांडण्यात आला, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली. यावेळी दादांच्या आठवणी सांगताना मुख्यमंत्री फडणवीस भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. (सविस्तर वाचा)

23 Feb, 26 : 02:08 PM

न मिळालेला उत्कृष्ट मुख्यमंत्री गमावला ही खंत: अमोल मिटकरी

न मिळालेला उत्कृष्ट मुख्यमंत्री गमावला ही खंत आहे, असे अमोल मिटकरी म्हणाले. अधिवेशनाच्या प्रथेप्रमाणे पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या सदस्य असलेल्या दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहण्यासाठी शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शोक प्रस्तावात बोलताना आमदार अमोल मिटकरी भावूक झाले.

23 Feb, 26 : 01:42 PM

भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची मंगळवारी घोषणा होण्याची शक्यता, रवींद्र चव्हाण पत्रकार परिषद घेणार

23 Feb, 26 : 01:21 PM

अफगाणिस्तानच्या एअर स्ट्राईकमध्ये ८० दहशतवादी ठार, पाकिस्तानचा दावा

पाकिस्तानच्या हवाई दलाने अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात केलेल्या मोठ्या एअर स्ट्राईकनंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. या हल्ल्यात 'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' (TTP) या दहशतवादी संघटनेचे किमान ८० दहशतवादी मारले गेल्याचा मोठा दावा पाकिस्तानने केला आहे. वाचा सविस्तर 

23 Feb, 26 : 01:14 PM

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत महाराष्ट्राच्या मनात संशय: भास्कर जाधव

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत महाराष्ट्राच्या मनात संशय असल्याचे आमदार भास्कर जाधव म्हणाले.  बारामतीमधील प्रत्येक माणसाला या घटनेबाबत प्रश्न पडला आहे,  अजित पवार महाराष्ट्राचे आधारवड होते, असंही भास्कर जाधव म्हणाले.

23 Feb, 26 : 12:59 PM

मेळघाटातील राणीगाव घाटामध्ये बोलेरो पिकअप वाहन पलटी, चार जण जागीच ठार

मेळघाटातील धारणी तालुक्यातील ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या राणीगाव ,सुसर्दा, शिवाझीरी नारदु या रस्त्याने प्रवास करत असलेली बोलेरो पिकअप वाहन रस्त्यावरील खड्ड्यामुळे ५० ते ६० फूट दरीत पलटी झाली. त्या मध्ये चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.  तर दहा ते बारा जण गंभीर जखमी झाले आहेत.

23 Feb, 26 : 12:46 PM

अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या चौकशीसाठी बारामतीकर एकवटले

 राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीच्या मागणीसाठी बारामतीतील प्रशासकीय भवन येथे मोठ्या प्रमाणात नागरिक जमले आहेत. स्वर्गीय अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी संपूर्ण राज्यभरातून होत आहे.

23 Feb, 26 : 12:23 PM

'अजितदादा आपल्यात नाहीत याची खंत': देवेंद्र फडणवीस

आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. पहिल्याच दिवशी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शोक प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अजितदादा आपल्यात नाहीत याची खंत आहे.  त्यांनी कधीही कठोर निर्णय घेताना मागे  पुढे पाहत नव्हते, त्यांची पोकळी भरुन काढणे कठीण आहे, असंही सीएम फडणवीस म्हणाले.

23 Feb, 26 : 12:10 PM

अवकाळी पावसाचा तडाखा; महागाव तालुक्यात गहू पिकाचे मोठे नुकसान

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुका येथे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे गहू पिकाला मोठा फटका बसला आहे. रात्रीच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यामुळे शिवारातील पिके आडवी पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महागाव तालुक्यातील कोंदरी व वाकण परिसरात गहू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक धोक्यात आले आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पिके जमिनीवर लोळल्याने उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अचानक झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत सापडले असून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

23 Feb, 26 : 11:55 AM

मुंबई- पुणे महामार्गावर टँकरचा अपघात

मुंबई- पुणे महामार्गावर पुन्हा टँकरचा अपघात झाल्याची बातमी समोर आली.  पोलीस आणि प्रशासनाच्या तत्परतेने वाहतूक कोंडी टळली असून ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. 

23 Feb, 26 : 11:48 AM

शरद पवार यांची प्रकृती स्थिर; डॉ. परवेझ ग्रॅण्ट यांची माहिती

शरद पवार यांची तब्येत सध्या चांगली आहे. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार करण्यात आले आहेत. सध्या ते विश्रांती घेत आहेत. कालपासून त्यांनी व्यवस्थित जेवण केले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. सर्व वैद्यकीय चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत आणि त्यांचे रिपोर्ट्स समाधानकारक आहेत. पुढील ४८ तासांत ते घरी जाऊन पुढील उपचार घेतील. काळजी करण्यासारखे काहीही कारण नाही. त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे.

23 Feb, 26 : 11:34 AM

भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस

 भंडाऱ्यात पहाटे पाच वाजतापासून विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे कापणीला आलेलं चना, तुळ, मुंग, उडीद यासह कडधान्य आणि फुलोऱ्यावर आलेल्या भाजीपाला पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. तर, उन्हाळी भात पिकाला हा पाऊस लाभदायक ठरणारा आहे. हवामान विभागाने २३ आणि २४ फेब्रुवारी या दोन दिवसात विजेचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

23 Feb, 26 : 11:24 AM

विरोधकांच्या बैठकीला शरद पवार राष्ट्रवादी का नव्हती? संजय राऊतांनी सांगितले कारण, अधिवेशनावरून टीका

विरोधकांच्या बैठकीला शरद पवार राष्ट्रवादी का नव्हती? संजय राऊतांनी सांगितले कारण, अधिवेशनावरून टीका  

23 Feb, 26 : 11:20 AM

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव, अजितदादांना श्रद्धांजली

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात आज (२३ फेब्रुवारी) मुंबईतील विधानभवनात होत असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वातावरण भावूक होण्याची शक्यता आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या निधनाबद्दल दोन्ही सभागृहात शोकप्रस्ताव मांडण्यात येणार आहे. 

23 Feb, 26 : 11:20 AM

इंदापूर, बारामती व दौंडमध्ये सकल हिंदू समाजाचा बंद आवाहन

सकल हिंदू समाजाकडून आज इंदापूर, बारामती आणि दौंड बंदच आवाहन करण्यात आले आहे. भिगवण घटनेच्या पार्श्वभूमीवर हे बंद पुकारण्यात आले आहे. भिगवण प्रकरणातील आरोपीवर पोस्को अंतर्गत कारवाई व्हावी; याशिवाय या प्रकरणातील सर्व आरोपींवर कारवाई करण्यात यावी. तसेच संबंधित तरुणी तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिली जावी आणि सुरू असलेल्या अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्यात यावा, या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे.

23 Feb, 26 : 11:01 AM

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विधानभवनात दाखल

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विधानभवनात दाखल झाल्या आहेत. विधानभवनात महायुतीच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. 

23 Feb, 26 : 11:00 AM

गोंदियात अवकाळी पावसाची हजेरी, धान पिकांना दिलासा, आंबा-भाजीपाल्याची चिंता

गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गोरेगाव, देवरी, सालेकसा तालुक्यासह अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे रब्बी हंगामातील धान पिकांना ओलावा मिळून फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र भाजीपाला आणि कडधान्य पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच आंब्याला आलेला मोहोर झडण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

23 Feb, 26 : 10:59 AM

काल शरद पवारांना हॅास्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते. - संजय राऊत

काल शरद पवारांना हॅास्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते. बैठकीला शरद पवार राष्ट्रवादीचे नेते आले नाहीत. मविआमध्ये अजिबात फुट नाही, राष्ट्रवादीचे अनेक नेते त्यावेळी मुंबईत नव्हते. - संजय राऊत.

23 Feb, 26 : 10:56 AM

सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षनेता द्यावा ही आमची मागणी आहे - विकास ठाकरे

सत्ता आली तेव्हापासून आम्ही विरोधक विरोधी पक्षाची मागणी करीत आहोत. सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षनेता द्यावा ही आमची मागणी आहे. सत्ताधाऱ्यांच्या मनात काय शंका आहे. काय अडचण आहे की विरोधी पक्ष नेता देता येत नाही आहे.

23 Feb, 26 : 10:55 AM

मोहोळ व अन्य ठिकाणी पडला अवकाळी पाऊस

सोलापूर : सोलापुरात सकाळपासून ढगाळ वातावरण; ग्रामीण भागातील वैराग, मोहोळ व अन्य ठिकाणी पडला अवकाळी पाऊस

23 Feb, 26 : 10:11 AM

देवदर्शनावरून परतताना भीषण अपघात; ४ मित्रांचा मृत्यू

राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे, ज्याने काही क्षणांत चार कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर चेचट टोल प्लाझाजवळ एका भरधाव कारने पुढे जाणाऱ्या ट्रकला मागून जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारमधील चारही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. वाचा सविस्तर

23 Feb, 26 : 09:53 AM

मोहोळ व अन्य ठिकाणी पडला अवकाळी पाऊस

सोलापूर : सोलापुरात सकाळपासून ढगाळ वातावरण; ग्रामीण भागातील वैराग, मोहोळ व अन्य ठिकाणी पडला अवकाळी पाऊस

23 Feb, 26 : 09:42 AM

भारत-अमेरिका व्यापार कराराला 'ब्रेक'! वॉशिंग्टनमधील महत्त्वाची बैठक अचानक रद्द; काय आहे कारण?

भारत आणि अमेरिका यांच्यात होणाऱ्या महत्त्वाकांक्षी अंतरिम व्यापार कराराच्या चर्चेला सध्या खीळ बसली आहे. २३ फेब्रुवारीपासून वॉशिंग्टनमध्ये होणारी दोन्ही देशांच्या मुख्य वार्ताकारांची अत्यंत महत्त्वाची बैठक तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. या निर्णयामुळे व्यापारी वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

23 Feb, 26 : 09:41 AM

मेक्सिकोमध्ये 'एल मेंचो'च्या मृत्यूनंतर ड्रग कार्टेलकडून हिंसाचार

अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने मेक्सिकन स्पेशल फोर्सने 'टापलपा' येथे केलेल्या मोहिमेत कुख्यात ड्रग तस्कर 'एल मेंचो' ठार झाला. यानंतर त्याच्या टोळीने अनेक बँका, सुपरमार्केट्स आणि व्यापारी संकुलांना आग लावली आहे. शेकडो गाड्यांना आग लावून मुख्य हायवे ब्लॉक करण्यात आले आहेत. मेक्सिकोतील अनेक विमानतळांवरील उड्डाणे थांबवण्यात आली आहेत.

 

23 Feb, 26 : 09:04 AM

नेपाळमध्ये प्रवासी बस त्रिशूली नदीत कोसळली

पोखराहून काठमांडूकडे जाणारी एक प्रवासी बस हायवेवरून थेट त्रिशूली नदीत कोसळली. या दुर्घटनेत १८ प्रवाशांचा मृत्यू झाला असून २५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

23 Feb, 26 : 09:02 AM

माजी रेल्वे मंत्री, तृणमूलचे ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांचे निधन

पश्चिम बंगालच्या राजकारणातील एक दिग्गज व्यक्तिमत्व आणि तृणमूल काँग्रेसचे संस्थापक सदस्य मुकुल रॉय यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे.

Web Title: Maharashtra Marathi News Live Updates 23 February 2026: Maharashtra assembly Budget Session, Vidhan Sabha Adhiveshan, CM Devendra Fadnavis, Ajit Pawar, NCP Sharad Pawar, Sunetra Pawar, t20 world cup, PM Narendra Modi