संतापजनक! बाथरूमच्या फलकावर छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी पद्मिनी यांचा फोटो; देशभरात संतापाची लाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 15:22 IST2026-02-23T15:10:57+5:302026-02-23T15:22:02+5:30
सिक्रीतील मिलान बँक्वेट हॉलच्या बाथरूममध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी पद्मिनी यांच्या प्रतिमांचा वापर केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

संतापजनक! बाथरूमच्या फलकावर छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी पद्मिनी यांचा फोटो; देशभरात संतापाची लाट
हरयाणातील सिक्री येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. सिक्री येथील एका बँक्वेट हॉलमधील प्रसाधनगृहांबाहेर दिशादर्शक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी पद्मिनी यांचा फोटो लावण्यात आल्याचे समोर आले आहे. पुरुष आणि महिला प्रसाधनगृहांबाहेर हे फोटो लावले आहेत. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. हा प्रकार पाहून नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि इतिहासप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिक्री परिसरातील मिलान बँक्वेट हॉलमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या लोकांना हा प्रकार लक्षात आला. बाथरूमच्या फलकांवर ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांची चित्रं लावण्यात आल्याचे त्यांना दिसले. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी बँक्वेट हॉलवर कारवाईची मागणी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचे संस्थापक, शौर्य, न्याय आणि राष्ट्राभिमानाचं प्रतीक मानले जातात, तर महाराणी पद्मिनी यांचे नाव त्याग, स्वाभिमान आणि पराक्रमाशी जोडले जाते. अशा थोर व्यक्तिमत्त्वांच्या फोटोंचा वापर चुकीच्या ठिकाणी करणे केवळ असंवेदनशील नाही, तर सांस्कृतिक वारशांचा अपमान असल्याचे अनेकांचे मत आहे. यामुळे कारवाई करण्याची मागणी होत आहे.
This is absolutely unacceptable. Chhatrapati Shivaji Maharaj is a revered figure for us, his image cannot be misused this way. I urge the Haryana Government to immediately get this image removed.
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) February 23, 2026
Why do BJP governments repeatedly allow insults to Chhatrapati Shivaji Maharaj's… pic.twitter.com/XEO8BNgBaP