कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 23:48 IST2026-05-10T23:47:00+5:302026-05-10T23:48:01+5:30
'ग्लोबल एनकॅप' (Global NCAP) द्वारे कारच्या सुरक्षेची चाचणी घेऊन तिला ० ते ५ स्टार असे रेटिंग दिले जाते. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या अहवालात काही लोकप्रिय कार प्रवाशांच्या सुरक्षेच्या कसोटीवर अपयशी ठरल्या आहेत. त्यांना चक्क '०' रेटिंग मिळाले आहे.

कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
आजकाल लोक कार खरेदी करताना केवळ प्रवास, हाच एक उद्देश समोर न ठेवता सुरक्षिततेचाही विचार करू लागले आहेत. आता कार खरेदी करताना ते 'सेफ्टी रेटिंग'ला विशेष महत्त्व देऊ लागले आहेत. 'ग्लोबल एनकॅप' (Global NCAP) द्वारे कारच्या सुरक्षेची चाचणी घेऊन तिला ० ते ५ स्टार असे रेटिंग दिले जाते. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या अहवालात काही लोकप्रिय कार प्रवाशांच्या सुरक्षेच्या कसोटीवर अपयशी ठरल्या आहेत. त्यांना चक्क '०' रेटिंग मिळाले आहे.
या यादीत पहिले नाव आहे सिट्रोन e-C3 (Citroen e-C3). ही एक इलेक्ट्रिक हॅचबॅक आहे. या कारला प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ० स्टार, तर मुलांच्या सुरक्षेसाठी केवळ १ स्टार मिळाला आहे. या कारचे बॉडी स्ट्रक्चर कमकुवत असून बाजूने होणाऱ्या धडकेत प्रवाशांना मोठा धोका असल्याचे चाचणीतून समोर आले आहे.
दुसरी कार म्हणजे, मध्यमवर्गीयांची आवडती मारुती सुझुकी इको (Maruti Suzuki Eeco). देखील सेफ्टी टेस्टमध्ये नापास झाली आहे. एअरबॅग्ज असूनही अपघाताच्या वेळी ड्रायव्हरच्या छातीला आणि गुडघ्यांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता या कारमध्ये अधिक आहे. हिला ग्लोबल NCAP मध्ये ०-स्टार रेटिंग मिळाले आहे. तसेच, मारुती सुझुकी एस-प्रेसो (S-Presso) हि देखील मारुतीची एक प्रसिद्ध कार आहे. सुरुवातीला हिला ० स्टार रेटिंग मिळाली होती. मात्र काही सुधारणा केल्यानंतर, तिला १ स्टार रेटिंग मिळाले. मात्र, असे असले तरी, तिची बॉडी पूर्णपणे मजबूत मानली जात नाही.
रेनॉल्ट क्विडला (Renault Kwid) ही एक बजेट कार म्हणून ओळखली जाते. या कारला Global NCAP मध्ये केवळ १ स्टार टेटिंग मिळाले आहे. यात ड्रायव्हरच्या छातीची आणि पायांची सुरक्षा कमकुवत असल्याचे आढळून आले. याशिवाय, बाहेरून अत्यंत दणकट दिसणारी महिंद्रा बोलेरो निओ (Mahindra Bolero Neo). हिलाही Global NCAP मध्ये केवळ १ स्टार रेटिंगच मिळाले आहे. तिला साईड इम्पॅक्ट आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी कमी रेटिंग मिळाले आहे. या सर्व कार लोकप्रिय असल्या तरी, सुरक्षिततेच्या जागतिक मानकांवर खऱ्या उतरलेल्या नाहीत.