RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की

...अन् चेजमास्टर कोहली पहिल्या चेंडूवर शून्यावर माघारी फिरला

By सुशांत जाधव | Updated: May 10, 2026 22:32 IST2026-05-10T22:19:42+5:302026-05-10T22:32:47+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 RCB vs MI Virat Kohli Got Out For A Golden Duck As Deepak Chahar Second Consecutive Time He Falls For A Duck | RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की

RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की

रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने दिलेल्या अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार बॅटर आणि चेज मास्टर विराट कोहली पुन्हा एकदा शून्यावर बाद झाला. दीपक चाहरनं त्याला गोल्डन डकसह तंबूचा रस्ता दाखवला. IPL मध्ये सलग दुसऱ्यांदा त्याच्यावर खाते न उघडता तंबूचा रस्ता धरण्याची वेळ आली. याआधी  लखनौ सुपर जाएंट्स विरुद्धच्या सामन्यात तब्बल ९ वर्षांनी IPL मध्ये शून्यावर बाद झाला होता. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात तो दमदार कमबॅक करेल, अशी अपेक्षा होती. पण सलग दुसऱ्यांदा त्याच्यावर शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढावली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

दुसऱ्यांदा ओढावली ही नामुष्की


मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली IPL मध्ये १२ व्या वेळी शून्यावर बाद झाला. RCB च्या संघाक़डून सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम त्याच्या नावे आहे. विशेष म्हणजे आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहास दुसऱ्यांदा विराट कोहलीवर एका हंगामात सलग दोन सामन्यात शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढावली. याआधी २०२२ च्या हंगामात लखनौ आणि हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याच्यावर ही नामुष्की ओढावली होती. 

...अन् चेजमास्टर  कोहली चाहरच्या जाळ्यात अडकला 

मुंबई इंडियन्सच्या संघाने तिलक वर्माच्या अर्धशतकासह ५७ (४२) नमन धीर ४७ (३२) च्या उपयुक्त खेळीच्या जोरावर पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ७ बाद १६६ धावा केल्या. या अल्प धावसंख्येचा बचाव करताना दीपक चाहर MI कडून पहिले षटक घेऊन आला. पहिल्या दोन चेंडूवर बेथलनं दोन चौकार मारून चहरच स्वागत केले. तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव घेत त्याने विराट कोहलीला स्ट्राइक दिले. चहरनं किंग कोहलीला पहिला चेंडू वाइड टाकला. पण त्यानंतर कोहलीनं मिड ऑफच्या दिशेन फटका मारला. राजा बावानं सर्वोत्तम झेल टिपला अन्  किंग कोहलीला शून्यावर माघारी फिरला. 

IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी

देवदत्त पडिक्कलचाही घेतला बदला

विराट कोहलीच्या रुपात MI ला पहिले आणि महत्त्वाची विकेट मिळवून दिल्यावर आपल्या दुसऱ्या षटकात दीपक चहरनं यंदाच्या हंगामात कमालीच्या फॉर्ममध्ये असलेल्या देवदत्त पडिक्कलची शिकार केली.  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या डावातील तिसऱ्या षटकात चार निर्धाव चेंडूवर चाकल्यावर पडिक्कल याने दिपक चाहरच्या पाचव्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारला. मग पुढच्या चेंडूवर त्याला झेलबाद करत चाहरनं षटकार मारल्याचा बदला घेतला. 

Web Title : कोहली का दुख: एमआई के खिलाफ गोल्डन डक; चाहर चमके!

Web Summary : विराट कोहली एमआई के खिलाफ गोल्डन डक पर आउट, आईपीएल में लगातार दूसरा शून्य। दीपक चाहर की शानदार गेंदबाजी ने कोहली और बाद में पडिक्कल को आउट कर खेल पलट दिया। चाहर के जादू से एमआई ने 166/7 का स्कोर सफलतापूर्वक बचाया।

Web Title : Kohli's Misery: Golden Duck Against MI; Chahar Shines!

Web Summary : Virat Kohli suffered a golden duck against MI, his second consecutive IPL zero. Deepak Chahar's brilliant bowling dismissed Kohli and later Padikkal, turning the game. MI scored 166/7, defended successfully thanks to Chahar's spell.