Latest Marathi News Live: होर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहिली पाहिजे; इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याचे पहिलेच विधान
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 19:23 IST2026-03-12T08:05:48+5:302026-03-12T19:23:24+5:30
महाराष्ट्र, देश - विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

Latest Marathi News Live: होर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहिली पाहिजे; इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याचे पहिलेच विधान
US-Israel Iran War, Maharashtra News Live Updates in Marathi 12 March 2026: अमेरिका - इस्रायल विरुद्ध इराण यांच्यातील युद्धाचे चटके महाराष्ट्रासह देशात जाणवू लागले असून LPG सिलिंडरचा तुटवडा चिंतेचा विषय ठरत आहे. इंधन, गॅस, ऊर्जा पुरवठा सुरळीत आहे आणि राहील, असं केंद्र आणि राज्य सरकार सांगत आहे, मात्र रस्त्यावर गॅस सिलिंडरसाठी रांगा लागल्याचं चित्र आहे. तिकडे, युद्ध थांबण्याऐवजी अधिकच तीव्र होत असल्याचे चित्र आहे. इराणने मध्य पूर्वेतील देशांवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. संसद आणि महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विरोधकांचा समाचार घेतला. टी 20 वर्ल्ड कप नंतर आता IPL चे वेळापत्रक जाहीर झाले असून २८ मार्चपासून हा 'रन'संग्राम रंगणार आहे.
LIVE
12 Mar, 26 : 05:40 PM
हॉटेल, रेस्टॉरंटला रॉकेल वापरण्याची परवानगी
भारताने आपल्या इंधन आयातीचे स्त्रोत विस्तारले आहेत. आता भारत केवळ आखाती देशांवर अवलंबून न राहता अमेरिका, नॉर्वे, कॅनडा, अल्जेरिया आणि रशिया यांसारख्या देशांकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आणि एलएनजी कार्गो मिळवत आहे. हे कार्गो दररोज भारतीय बंदरांवर दाखल होत असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली. एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी, उद्योग आणि हॉटेल, रेस्टॉरंट क्षेत्राला एका महिन्यासाठी बायोमास, आरडीएफ पेलेट्स आणि रॉकेल सारख्या पर्यायी इंधनांचा वापर करण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली.
12 Mar, 26 : 05:37 PM
देशात सीएनजीचा पुरवठा १०० टक्के सुरू
"गेल्या पाच दिवसांत, एलपीजी उत्पादनात २८ टक्के वाढ झाली आहे आणि प्रत्यक्षात पुढील खरेदी सुरू आहे. मोदी सरकारची सर्वोच्च प्राथमिकता ही भारतातील ३३ कोटी कुटुंबांच्या, विशेषतः गरीब आणि वंचितांच्या स्वयंपाकघरात कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये ही आहे. देशांतर्गत पुरवठा पूर्णपणे संरक्षित आहे. देशात सीएनजीचा पुरवठा १०० टक्के सुरू आहे. गॅस सिलिंडरबाबत लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. केवळ भीतीपोटी मागणी वाढली आहे, मात्र पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत आहे," असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटलं.
12 Mar, 26 : 04:56 PM
राहुल गांधींचं सरकारवर टीकास्त्र
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. देशाच्या ऊर्जा सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त करताना राहुल गांधी म्हणाले की, जग झपाट्याने बदलत असून संकट आता आपल्या दारात येऊन उभं राहिलं आहे. जर सरकारने त्वरित कठोर पावलं उचलली नाहीत, तर येणाऱ्या काळात कोट्यवधी कुटुंबांना समस्यांचा सामना करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. वाचा सविस्तर
12 Mar, 26 : 04:50 PM
"भारतावर वाईट परिणाम होतील"
"मध्य-पूर्वेत युद्ध भडकले आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. त्याचे मोठे परिणाम विशेषतः भारतावर होणार आहेत. कारण, होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यात आली आहे. आपल्या देशात येणारं तेल आणि नैसर्गिक वायूंचा मोठा भाग याच मार्गाने येतो. त्यामुळे आपल्यावर वाईट परिणाम होतील. रेस्टॉरंट्स बंद होत आहेत. एलपीजीबाबत मोठ्या प्रमाणात घबराट पसरली आहे. ही तर फक्त सुरुवात आहे.” - राहुल गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते
#WATCH लोकसभा में विपक्ष के नेता और कांग्रेस सांसद राहुल गांधी ने कहा, "मिडिल ईस्ट में जंग छिड़ गई है। यूनाइटेड स्टेट्स, इज़राइल और ईरान के बीच जंग छिड़ी हुई है। इस जंग के बहुत बड़े नतीजे होंगे। दुनिया का 20% तेल जिस सेंट्रल रास्ते से आता है, यानी स्ट्रेट ऑफ होर्मुज, उसे बंद कर… pic.twitter.com/pZA4Thfuxc
— ANI_HindiNews (@AHindinews) March 12, 2026
12 Mar, 26 : 04:28 PM
लोकसभेत एपस्टीनचा उल्लेख, राहुल गांधींच्या भाषणावर गोंधळ
लोकसभेत एपस्टीन फाईल्सचा उल्लेख, राहुल गांधींच्या विधानावर गोंधळ, गॅस तुटवड्याचा प्रश्न उपस्थित करताना पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचे एपस्टीनशी संबंध असल्याचे विधान केले. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी यावर आक्षेप घेत ज्या विषयावर तुम्ही नोटीस दिली त्यावर बोलावे. इतर विषयाचा उल्लेख करू नये. हे सभागृह नियमानुसार चालते असं अध्यक्षांनी म्हटलं.
12 Mar, 26 : 03:10 PM
राज्यसभेत खरगेंचा सवाल, नड्डांचा पलटवार
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला यांच्यावर काल रात्री झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा मुद्दा गुरुवारी संसदेतही गाजला. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हा विषय उपस्थित करत केंद्र सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. तसेच त्यांनी सरकारच्या हेतूवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यावर सभागृह नेते जे.पी. नड्डा यांनी ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं सांगत या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. मात्र, त्याचवेळी त्यांनी विरोधी पक्षनेते खरगे यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला. वाचा सविस्तर
12 Mar, 26 : 02:48 PM
दिशाहीन परराष्ट्र धोरणामुळे देशावर ही धोकादायक वेळ आली - राहुल गांधी
"जग वेगाने बदलत आहे आणि संकट आपल्या उंबरठ्यावर आहे. जर सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत, तर एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कोट्यवधी भारतीय कुटुंबांसाठी मोठी समस्या बनतील. पंतप्रधान मोदींनी भारताच्या ऊर्जा सुरक्षेशी तडजोड केली आहे. कमकुवत आणि दिशाहीन परराष्ट्र धोरणामुळे देशावर ही धोकादायक वेळ आली आहे. आता खरे काय ते देशाला सांगण्याची आणि देशाला तयार करण्याची वेळ आली आहे. अन्यथा, याची मोठी किंमत भारताच्या सर्वसामान्यांना चुकवावी लागेल," असं राहुल गांधी म्हणाले.
12 Mar, 26 : 02:39 PM
PMPML बस खरेदीत भ्रष्टाचार; अधिकाऱ्यांविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) मधील अधिकाऱ्यांनी भ्रष्ट पद्धतीने राबविलेल्या ज्युनियर क्लार्क पदोन्नती व पदभरती प्रक्रियेतील गैरप्रकार, बस खरेदीतील अनियमितता, कंत्राट प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव, स्टोअर विभागामार्फत साहित्याची भ्रष्ट पद्धतीने खरेदी तसेच बसस्टॉपवरील जाहिरात कंत्राटातील कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने पुण्यातील PMPML मुख्य कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.
12 Mar, 26 : 01:36 PM
सौदीहून जहाज आलं होss
देशात इंधन टंचाईची भीती व्यक्त होत असताना, मुंबई बंदरात एक दिलासादायक चित्र दिसलं. सौदीच्या रस तनुरा बंदरातून कच्चं तेल घेऊन निघालेलं जहाज अखेर मुंबई बंदरात सुखरूप दाखल झालं आणि सगळ्यांच्याच जीवात जीव आला.
#WATCH | Liberia-flagged tanker ship 'Shenlong' enters Indian waters near Mumbai Port. It was captained by an Indian and was loaded with crude oil from the Saudi port Ras Tanura.
— ANI (@ANI) March 12, 2026
Latest visuals from Mumbai Port pic.twitter.com/4BWABAsZ88
12 Mar, 26 : 01:11 PM
"विरोधी पक्षनेत्यांना कुठलाही विशेष अधिकार नाही"
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पदावरून हटवण्याचा प्रस्ताव बुधवारी लोकसभेत आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला. त्यानंतर, आज ओम बिर्ला सभापतींच्या खुर्चीत पुन्हा विराजमान झाले.
ते म्हणाले, "स्वतंत्र भारताच्या संसदीय इतिहासात लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर तिसऱ्यांदाच चर्चा झाली. सभागृहातील प्रत्येक सदस्याने नियम आणि प्रक्रियेच्या चौकटीत राहून मुद्द्यांवर आपले मत मांडावे. त्यादृष्टीने मी नेहमीच प्रयत्न केला आहे. सभागृहाचे नेते असोत, विरोधी पक्षनेते असोत किंवा कोणतेही मंत्री असोत; सर्वांना नियम आणि प्रक्रियेनुसारच सभागृहात बोलण्याचा अधिकार आहे. काही जणांचा असा समज आहे की विरोधी पक्षनेते नेहमी इतरांपेक्षा वरचढ असतात आणि कोणत्याही विषयावर बोलू शकतात; मात्र असा कोणालाही विशेष अधिकार नाही."
लोकसभा स्पीकर ओम बिरला ने कहा, "चाहे सदन के नेता हो या विपक्ष के नेता या कोई भी मंत्री, सभी को नियमों और प्रक्रियाओं के अनुसार सदन में बोलने का अधिकार है। कुछ लोगों का मानना है कि विपक्ष के नेता हमेशा बाकियों से ऊपर रहे हैं और किसी भी विषय पर बोल सकता है, किसी को यह विशेष… pic.twitter.com/FdjFCYybsx
— ANI_HindiNews (@AHindinews) March 12, 2026
12 Mar, 26 : 12:49 PM
रोहित पवारांनी घेतली राहुल गांधींची भेट, अजित पवारांच्या अपघाताचा मुद्दा
आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत दौऱ्यात लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूची चौकशी करण्याचा मुद्दा लोकसभेत मांडावा अशी विनंती त्यांनी राहुल गांधींकडे केली.
लोकसभेतील प्रभावी विरोधी पक्षनेते माननीय राहुल जी गांधी यांची दिल्लीत भेट घेऊन अजितदादांच्या संशयास्पद विमान अपघातासंदर्भात त्यांच्याशी अर्ध्या तासाहून अधिक विस्तृत चर्चा केली.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 12, 2026
तसंच या अपघाताबाबत वेगवेगळ्या स्त्रोतांकडून आम्ही अत्यंत मेहनतीने जमा केलेली संपूर्ण माहिती त्यांना… pic.twitter.com/iWQarTj32W
12 Mar, 26 : 12:45 PM
जया बच्चन यांचं सरकारवर टीकास्त्र
समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी एलपीजी (LPG) संकटाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी दावा केला आहे की, गॅससोबतच आता कांदा-बटाट्याचे दरही वाढत आहेत. "सरकार जर म्हणत असेल की एलपीजीचं संकट नाही, तर ठीक आहे. लोक चूल पेटवून जेवण बनवतील, पण कांदा-बटाट्याचं काय करणार?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.वाचा सविस्तर
12 Mar, 26 : 12:37 PM
गोंदियात हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर, जिल्हा प्रशासनाकडून दोन हॉटेलवर कारवाई
आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका भारतात देखील बसत असून गॅस तुटवडा निर्माण झाला आहे. आणि याचा मोठा परिणाम हॉटेल व्यवसायावर पडला असून हॉटेल व्यवसायिक घरगुती सिलेंडर चा वापर करत असल्याचे गोंदिया जिल्ह्यात बघायला मिळाले यावरून गोंदिया जिल्हा प्रशासनाने गोंदिया आणि तिरोडा या ठिकाणी दोन कारवाया केल्या असून यामध्ये 7 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. तर सध्या तरी गोंदिया जिल्ह्यात मुबलक प्रमाणात सिलेंडरचा साठा असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील यांनी केले आहे.
12 Mar, 26 : 12:27 PM
सातारा येथे भीषण अपघात, कार खोल दरीत कोसळली
पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील बावली टोक–चिरेखिंड परिसरात गुरुवारी पहाटे भीषण अपघात घडला. मुंबईहून गावाकडे परतणारी कार सुमारे ३०० ते ४०० फूट खोल दरीत कोसळली. प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स, स्थानिक ग्रामस्थ आणि पोलादपूर पोलिसांच्या मदतीने अत्यंत धाडसी पद्धतीने बचावकार्य राबवण्यात आले. ५ जखमींना बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.
12 Mar, 26 : 12:17 PM
इराकमध्ये तेल जहाजावरील हल्ल्यात भारतीयाचा मृत्यू
सेफसी विष्णू या अमेरिकन तेल जहाजावर हल्ला झाला. या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला असून, भारताच्या इराकमधील उच्चायुक्तालयाने याबद्दल माहिती दिली आहे. इराकमधील बसराजवळ जहाजावर हल्ला झाला.
On March 11, 2026, a US-owned crude oil tanker Safesea Vishnu, sailing under the Marshall Islands flag, was attacked near Basra, Iraq, in which one Indian crew member unfortunately lost his life. The remaining 15 Indian crew have since been evacuated to a safe place. Embassy of…
— India In Iraq (@EI_Baghdad) March 12, 2026
12 Mar, 26 : 11:51 AM
इराणने मैत्री निभावली; होर्मुझमधून भारतीय जहाजे पुढे निघाली...
पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षादरम्यान, भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघची यांच्यातील दूरध्वनी संभाषणानंतर, इराणनेभारतीय टँकरना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग मंजूर केला आहे. भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, कारण होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक आहे. तो जागतिक तेल आणि नैसर्गिक वायूचा महत्त्वपूर्ण भाग वाहून नेतो. (सविस्तर वाचा)
12 Mar, 26 : 11:17 AM
विधानभवनात बॉम्बस्फोट करण्याची धमकी, श्वानाला पाचारण
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच विधानभवनात बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीचा मेसेज आला. यामुळे यंत्रणांची धावपळ उडाली. विधान भवन रिकामे करण्यात आले. अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही बाहेरच थांबवण्यात आले. त्यानंतर श्वानाच्या मदतीने परिसराची झाडाझडती घेण्यात आली.
Mumbai, Maharashtra: A bomb threat email targeting Maharashtra Vidhan Bhavan triggered a security alert. The premises were evacuated, journalists and staff kept outside, while the Bomb Detection and Disposal Squad and sniffer dogs began search operations pic.twitter.com/74Fdptqbux
— IANS (@ians_india) March 12, 2026
12 Mar, 26 : 11:00 AM
सोन्या-चांदीची किंमत झाली कमी; २ दिवसांत Silver मध्ये १० हजारांची घसरण
Gold Silver Price Today MCX: आज १२ मार्च २०२६, गुरुवार रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर सोने आणि चांदीच्या किमतीत घट पाहायला मिळत आहे. सोन्याचा भाव १,६१,६६० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव २,६६,९६९ रुपये प्रति किलो वर आला. विशेष म्हणजे केवळ दोन दिवसांत चांदीच्या किमतीत १०,००० रुपयांहून अधिक, तर सोन्याच्या किमतीत सुमारे १,५०० रुपयांची घसरण झाली आहे.
12 Mar, 26 : 10:30 AM
सोलापुरात गॅस तुटवडा नाही; नागरिकांनी साठेबाजी करू नये – जिल्हाधिकारी कुलदीप जंगम
सोलापूर जिल्ह्यात एकूण 94 गॅस एजन्सी असून त्यापैकी 20 आयओसीएलच्या आहेत. काही ठिकाणी सर्व्हरची तांत्रिक अडचण असल्यामुळे गॅस बुकिंग होत नसल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. याबाबत आयओसीएलच्या व्यवस्थापनाशी चर्चा झाली असून ही समस्या लवकरच दूर होईल. दरम्यान नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि गॅसचा अतिरिक्त साठा करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
12 Mar, 26 : 10:13 AM
शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरूच; सेन्सेक्स ९०० अंकांनी आपटला
भारतीय शेअर बाजारात गुरुवारी पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळाली. कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजारातील स्थिती नकारात्मक राहिली आणि गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. गुरुवारी व्यवहाराच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स ९५२.६१ अंकांच्या भारी घसरणीसह ७५,९११.१० च्या स्तरावर आला. त्याच वेळी, निफ्टी २८९.६० अंकांनी घसरून २३,५७७.२५ च्या स्तरावर व्यवहार करताना दिसला.
भारतीय शेअर बाजारात गुरुवारी पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळाली. कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजारातील स्थिती नकारात्मक राहिली आणि गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं.#sharemarket#investmenthttps://t.co/6uFsK4Us55
— Lokmat (@lokmat) March 12, 2026
12 Mar, 26 : 10:08 AM
इराणचे १८ ड्रोन्स सौदी अरेबियाने पाडले
इराणने पुन्हा एकदा हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. खवळलेल्या इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजे, सौदी अरेबियावर हल्ला केला.
इराणकडून डागण्यात आलेले १८ ड्रोन्स सौदी अरेबियाने हवेतच निष्क्रिय करून पाडले. सौदीच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
एसपीए या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांत अनेक ड्रोन्स अडवून पाडण्यात आले आहेत. एक ड्रोन शायबह तेल साठ्याच्या दिशेने जात होता. तो रुब अली खली म्हणजे एम्प्टी क्वार्टर वाळवंटाच्या सीमेवर पाडण्यात आले.
12 Mar, 26 : 09:50 AM
वेरूळ घाटात कांदा वाहतूक करणाऱ्या ट्रकला अचानक आग
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ घाटात कांदा वाहतूक करणाऱ्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ट्रकच्या केबिनमध्ये आग लागल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली. मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
12 Mar, 26 : 09:49 AM
'इराणविरोधातील युद्ध आम्ही जिंकलो आहोत, आता अमेरिकेचे सैन्य फक्त ...', ट्रम्प यांचा दावा
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला करत युद्धाची सुरूवात केली. १२ दिवस उलटल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्र्रम्प यांनी इराणविरोधातीलयुद्ध आम्ही जिंकलो आहोत, असा दावा केला. सुरूवातीला केलेल्या काही हल्ल्यानंतरच युद्धाचा परिणाम समोर आला, असेही ट्रम्प म्हणाले. (सविस्तर वाचा)
12 Mar, 26 : 09:24 AM
विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. दरम्यान, आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतीलविधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली असून, या घटनेनंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण विधान भवन परिसराचा ताबा घेतला आहे.
12 Mar, 26 : 08:34 AM
माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार करणारा कमल सिंह कोण?
बुधवारी रात्री उशिरा एका लग्न सोहळ्यात असताना जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांची गोळ्या घालून हत्या करण्याचा प्रयत्न झाला. ज्यावेळी अब्दुल्लांवर गोळी झाडण्यात आली, तेव्हा त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरीही होते. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. ज्यात आरोपी अचानक रिव्हॉल्व्हर काढतो आणि जवळून त्यांच्यावर गोळी झाडताना दिसत आहे. (सविस्तर वाचा)
12 Mar, 26 : 08:34 AM
होर्मुझ स्ट्रेट सामुद्रधुनीत दोन जहाज उडवली, हल्ल्यानंतर व्हिडीओ
युद्धामुळे होर्मुझ स्ट्रेट सामुद्रधुनीतील वाहतूक ठप्प झाली आहे. काही जहाजांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाला.
तेल वाहून नेणाऱ्या दोन जहाजावर हल्ला केला गेला. फारस खाडीतील जहाज जळत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. यात एक अमेरिकेच्या सेफसी विष्णू कंपनीचे जहाज आहे, तर दुसरे जहाज ग्रीकचे आहे.
तेल की चढ़ती क़ीमत से अलबला गए ट्रंप ने बिना सोचे समझे तेल टैंकरों को स्ट्रेट ऑफ़ होर्मूज़ पार करने की सलाह दे दी। लिहाज़ा दो तेल टैंकर ईरानी हमले का शिकार हो गए।
— Umashankar Singh उमाशंकर सिंह (@umashankarsingh) March 12, 2026
टैंकर ट्रैकर्स के अनुसार, फारस की खाड़ी में आग लगने वाले जहाजों में से एक U.S. का SafeSea विष्णु है। दूसरा जहाज… https://t.co/iVl1ue3crXpic.twitter.com/z04rJfrVcF
12 Mar, 26 : 08:33 AM
इराणने युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेसमोर ठेवल्या ३ अटी
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून जागतिक शांततेसाठी धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसौद पेजेश्कियान यांनी युद्धविरामासाठी पुढाकार घेतला असला तरी, त्यांनी अमेरिकेसमोर अत्यंत कठीण अशा ३ अटी ठेवल्या आहेत. या अटी मान्य झाल्या तरच युद्ध थांबेल, असा स्पष्ट इशारा इराणने दिला आहे. (सविस्तर वाचा)