Jaya Bachchan : "लोक चूल पेटवून जेवण बनवतील, पण कांदा-बटाट्याचं काय?"; जया बच्चन यांचं सरकारवर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 12:31 IST2026-03-12T12:27:31+5:302026-03-12T12:31:53+5:30
Jaya Bachchan : समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी एलपीजी (LPG) संकटाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

Jaya Bachchan : "लोक चूल पेटवून जेवण बनवतील, पण कांदा-बटाट्याचं काय?"; जया बच्चन यांचं सरकारवर टीकास्त्र
समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी एलपीजी (LPG) संकटाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी दावा केला आहे की, गॅससोबतच आता कांदा-बटाट्याचे दरही वाढत आहेत. "सरकार जर म्हणत असेल की एलपीजीचं संकट नाही, तर ठीक आहे. लोक चूल पेटवून जेवण बनवतील, पण कांदा-बटाट्याचं काय करणार?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
विरोधक जनतेमध्ये भीती पसरवत असल्याचा आरोप सरकारने केला होता. यावर प्रत्युत्तर देताना जया बच्चन म्हणाल्या की, "विरोधक जनतेमध्ये भीती पसरवत नाहीत, तर समाजात आधीच भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जेव्हा समाज एखाद्या मुद्द्यावर घाबरलेला असतो, त्यांना भीती वाटत असते तेव्हा आम्ही त्यांचा आवाज उठवतो."
"करदात्यांसाठी सरकारकडे काहीच नाही. तुम्ही त्यांना अक्षरशः मारत आहात, त्यांच्यासाठी कोणत्याही सुविधा नाहीत. मंत्र्यांसाठी सायरन आणि लाल दिव्यांची सोय आहे, त्यांच्यासाठी रस्ते अडवले जातात. पण सामान्य माणसाला काय मिळत आहे? गरीब माणूस हवालदिल झाला आहे. जे बिचारे गरीब आहेत आणि कर भरू शकत नाहीत, त्यांच्यासाठी काय तरतूद आहे? त्यांच्याकडे ना गॅस आहे ना इतर सोयी-सुविधा."
पेट्रोलियम मंत्रालयाने बुधवारी स्पष्ट केलं की, देशांतर्गत घरगुती गॅसची गरज पूर्ण करण्यासाठी भारताकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन सिलिंडर बुक करण्याची गरज नाही. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत रिफायनरी कंपन्यांनी एलपीजी उत्पादनात २५ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.