हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 08:11 IST2026-05-12T07:54:33+5:302026-05-12T08:11:02+5:30
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर या डोंगराळ राज्यांमध्ये जोरदार वादळे, मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.

हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर या डोंगराळ राज्यांमध्ये जोरदार वादळे, मुसळधार पाऊस, गारपीट आणि वीज कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी घरांची आणि शाळांची छपरे उडून गेली, काही ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब कोसळले, तर काही ठिकाणी वीज कोसळून पशुधनाचे बळी आहेत.
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
हवामान विभागाने पुढील दोन दिवस परिस्थिती आव्हानात्मक राहील असा इशारा दिला आहे. रविवारी रात्री हिमाचल प्रदेशात ताशी सुमारे ६० किलोमीटर वेगाने आलेल्या वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंडी, कुल्लू, उना, हमीरपूर, चंबा, शिमला आणि कांग्रा जिल्ह्यांमध्ये घरे, शाळा आणि गोठ्यांचे नुकसान झाले आहे.
कुल्लूमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू
कुल्लूच्या नगर परिसरात वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि इतर दोघे भाजले. शिला नाला परिसरात चाळीस मेंढ्या आणि बकऱ्या ठार झाल्या. अनेक ट्रान्सफॉर्मर निकामी झाल्याने अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आणि ३६ रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली.
मंडी जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला असून, तेथील ७० घरांचे नुकसान झाले आहे. काढणी झालेल्या गव्हाच्या पिकांचे आणि सफरचंदांसहित इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. उत्तराखंडमध्ये सततच्या पावसामुळे आणि गारपिटीमुळे तापमानात लक्षणीय घट झाली आहे. डेहराडून, मसुरी, पिथोरगड आणि बागेश्वरसह अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला.
हवामान विभागाने उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, चमोली, बागेश्वर आणि पिथोरगडसाठी पुढील ४८ तासांकरिता ऑरेंज अलर्ट जारी केला असून, या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केदारनाथ धाम परिसरात दाट धुके आणि कमी दृश्यमानतेमुळे दोन हेलिकॉप्टर्सना अगस्त्यमुनी हेलिपॅडवर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. हवामान सुधारल्यानंतर उड्डाणे पुन्हा सुरू करण्यात आली.