11 May, 26 12:56 PM
सोमनाथ मंदिरावर हेलिकॉप्टरच्या मदतीने करण्यात आली पुष्पवृष्टी
सोमनाथ मंदिरावर हेलिकॉप्टरच्या मदतीने करण्यात पुष्पवृष्टी आली
11 May, 26 12:15 PM
चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
हिमाचल प्रदेशातील चंबा-नूरपूर नॅशनल हायवेवर सोमवारी पहाटे एक काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली आहे. ककीरा जवळील घार भागात एक कार अनियंत्रित होऊन तब्बल ३०० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातातगुजरातच्या ६ पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चालकाचाही समावेश असल्याचे समजते.
11 May, 26 12:14 PM
पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि जागतिक ऊर्जा बाजारावरील दबावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना तेल, गॅसचा वापर कमी करण्याचे आणि सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे. मात्र, पंतप्रधानांच्या या आवाहनावरून समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर कडक शब्दांत टीका केली आहे. "निवडणूक संपताच सरकारला संकट आठवू लागले आहे, पण खरं तर देशासाठी सर्वात मोठे संकट हे भाजपच आहे," अशा शब्दांत अखिलेश यांनी तोफ डागली आहे.
11 May, 26 11:34 AM
भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."
पश्चिम आशियातील युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पेट्रोल, डिझेलसह इंधनबचतीचं आवाहन केलं. 'वर्क फ्रॉम होम', ऑनलाईन बैठका, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग या पद्धती पुन्हा सुरू करा. पेट्रोल-डिझेलची बचत करणं ही राष्ट्रीय गरज आहे असं सांगताना त्यांनी लग्नासाठी वर्षभर सोनं खरेदी टाळण्याचाही सल्ला दिला आहे. (सविस्तर वाचा)
11 May, 26 11:26 AM
सोमनाथ अमृत महोत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती, सोमनाथ मंदिरात केली पूजा
गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिरच्या सोमनाथ अमृत महोत्सव सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थिती राहिले आहेत. तसेच पंतप्रधान मोदी यांनी सोमनाथ मंदिरात पूजा केली.
11 May, 26 11:25 AM
"निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
पंतप्रधान मोदींच्या सल्लावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. "भाजपशासित राज्यांना आणि विशेषतः महाराष्ट्र सरकारला हे आधी सांगण्याची गरज आहे. असं केलं तर कदाचित जनतेला काटकसर करण्याची गरजही पडणार नाही" असं म्हटलं आहे. तसेच "आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे, पेट्रोल-डिझेल दरवाढीचे संकेत तर नाहीत ना, अशीही शंका येते..." असंही रोहित यांनी म्हटलं. वाचा सविस्तर
11 May, 26 11:05 AM
सिंधुदुर्गमध्ये अवकाळीचा हापूस आंबा कॅनिंगवर फटका
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून मागील महिन्यापासून आंबा कॅनिंगला सुरुवात झाली आहे. कॅनिंगमधील हापूस आंबा प्रामुख्याने पल्प आणि ज्यूस निर्मितीसाठी वापरला जातो. विशेषतः वेंगुर्ला तालुक्यातून मोठ्या प्रमाणात आंबा कॅनिंगसाठी पाठवला जातो. मात्र यंदा अवकाळी पावसाचा मोठा फटका या व्यवसायालाही बसल्याचे चित्र आहे.
11 May, 26 10:44 AM
सगळा त्याग सामान्य जनतेने करायचा आणि मोदी फक्त कॅमेऱ्यासमोर भाषणं देत फिरणार? मोदींच्या आवाहनावर हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
जेव्हा जगातील इतर देश संभाव्य संकटासाठी नियोजन आणि तयारी करत होते, तेव्हा मोदी आणि भाजप फक्त निवडणुका, जाहिराती, धर्मांधता आणि द्वेषाचे राजकारण करण्यात मग्न होते. राहुल गांधी सतत इशारे देत होते, पण सत्तेच्या अहंकारात बुडालेल्या मोदी सरकारने देशाला थेट संकटाच्या खाईत ढकलले.
11 May, 26 10:42 AM
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करण्याचं आणि कोरोनाकाळासारखी खबरदारी घेण्याचं आवाहन केल्याने देशभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लवकरच वाढ होईल,अशी शक्यता वर्तवली जात आहे.
11 May, 26 10:28 AM
राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर तेलाचे संकट गडद होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर संयमाने करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, पंतप्रधानांच्या या 'सल्ल्यावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. "मोदींनी दिलेले सल्ले हे उपदेश नसून त्यांच्या अपयशाचे पुरावे आहेत," अशा शब्दांत गांधींनी निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट केली.
11 May, 26 10:26 AM
चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांचे PA चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे आहे. पश्चिम बंगालपोलिसांच्या STF ने या प्रकरणी तीन जणांना अटक केली असून यात एका कुख्यात 'हिस्ट्रीशीटर'चा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहार आणि उत्तर प्रदेशमधून तिघांना अटक करण्यात आली आहेत. पोलीस लवकरच पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा पूर्ण खुलासा करणार आहेत. वाचा सविस्तर