1 / 7सोमवारी सकाळी कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे डॉलर वधारला आणि त्याचा परिणाम म्हणून 'एमसीएक्स'वर (MCX) सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली.2 / 7सकाळी ९:१० च्या सुमारास, एमसीएक्सवर सोन्याचा जूनचा वायदा ०.१०% नी घसरून १,५२,३७६ रुपये प्रति १० ग्रॅम वर होता, तर चांदीचा जुलैचा वायदा ०.६४% च्या वाढीसह २,६३,५९९ रु. प्रति किलो वर व्यवहार करत होता.3 / 7कच्च्या तेलाचा बेंचमार्क असलेल्या 'ब्रेंट क्रूड'च्या किमतीत ५% वाढ होऊन ती प्रति बॅरल १०५ डॉलरच्या पार गेल्याने डॉलर इंडेक्स ०.२०% नी वधारला. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि अमेरिका-इराण यांच्यातील चर्चा फिस्कटल्याने महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. 4 / 7यामुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह यावर्षी व्याजदरात कोणतीही कपात करणार नाही, अशा अपेक्षा बळावल्या आहेत. प्रदीर्घ काळ उच्च राहणारे व्याजदर सोन्यासारख्या गुंतवणूक पर्यायासाठी नकारात्मक मानले जातात.5 / 7अमेरिका आणि इराणमधील तणाव हा सोने तसेच शेअर बाजारासाठी मोठा अडथळा ठरत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा शांततेचा प्रस्ताव 'अस्वीकार्य' असल्याचे सांगत तो नाकारला आहे.6 / 7पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशवासियांना संबोधित करताना पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केलं. या वर्षात सोने-चांदी खरेदी करू नका, असाही सल्ला पीएम मोदी यांनी दिला. 7 / 7आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय घडामोडी आणि जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता यामुळे आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे.