'बिग बॉस ओटीटी' फेम आणि प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादव पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. यावेळी तो लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर असल्याचं समोर आलं आहे. एल्विशला या गँगकडून धमकीचा मेसेज आला आहे. एल्विशकडे १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. जर त्याने हे पैसे दोन दिवसांत दिले नाहीत, तर त्याला गोळ्या घालून ठार मारलं जाईल, अशी धमकी देण्यात आली आहे.
एल्विशला यापूर्वीही अनेकदा धमकीचे कॉल्स आणि मेसेज आले आहेत. याआधी गुरुग्राममधील त्याच्या घरावर अज्ञात व्यक्तीने गोळीबारही केला होता. एल्विशच्या घरावर झालेला तो हल्ला लॉरेन्स गँगनेच केला होता, असं म्हटलं जातं. आता त्याच्याकडे मोठी खंडणी मागितल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
केवळ एल्विशच नाही, तर त्याच्या वडिलांनाही धमकीचा मेसेज मिळाला आहे. "दोन दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू" असं या मेसेजमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. या घटनेनंतर एल्विशने सेक्टर-५६ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध संबंधित कलमान्वये एफआयआर (FIR) नोंदवला आहे.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत एल्विशने सांगितलं की, ५ मे रोजी त्याला एका परदेशी क्रमांकावरून व्हॉट्सॲप कॉल आला होता, जो त्याने उचलला नाही. त्यानंतर काही वेळाने त्याच क्रमांकावरून व्हॉट्सॲपवर मेसेज आला, ज्यामध्ये १० कोटी रुपये देण्याची मागणी करण्यात आली आणि पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली गेली.
Web Summary : YouTuber Elvish Yadav faces death threats from the Lawrence Bishnoi gang, demanding ₹10 crore. Failure to pay within two days will result in fatal consequences. Yadav previously faced gunfire at his residence, now under police investigation after filing a complaint.
Web Summary : यूट्यूबर एल्विश यादव को लॉरेंस बिश्नोई गिरोह से जान से मारने की धमकी मिली है, जिसमें ₹10 करोड़ की मांग की गई है। दो दिनों के भीतर भुगतान करने में विफलता के परिणाम घातक होंगे। यादव ने पहले अपने आवास पर गोलीबारी का सामना किया, शिकायत दर्ज करने के बाद अब पुलिस जांच कर रही है।