Rekha Jhunjhunwala Stock Down: टाटा समूहाची दिग्गज कंपनी असलेल्या टायटनच्या शेअर्समध्ये सोमवारी मोठी पडझड पाहायला मिळाली. सोमवारी बाजार उघडताच बीएसईवर टायटनचा शेअर ७ टक्क्यांहून अधिक घसरून ४,१५१.४० रुपयांवर पोहोचला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी हैदराबादमधील एका कार्यक्रमात नागरिकांना पुढील एक वर्ष सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन केलं. या आवाहनाचा मोठा परिणाम टायटनसह सर्वच ज्वेलरी कंपन्यांच्या शेअर्सवर झालाय.
रेखा झुनझुनवाला यांना मोठा आर्थिक फटका
प्रसिद्ध गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांचा टायटन कंपनीत मोठा वाटा आहे. मार्च २०२६ च्या तिमाहीच्या आकडेवारीनुसार, त्यांच्याकडे टायटनचे ४,७१,८४,४७० शेअर्स (५.३१ टक्के हिस्सा) आहेत. शुक्रवारी हा शेअर ४,५१३.४० रुपयांवर बंद झाला होता, मात्र सोमवारी तो ३६२ रुपयांनी घसरला. या एकाच झटक्यात रेखा झुनझुनवाला यांच्या एकूण संपत्तीत सुमारे १,७०० कोटी रुपयांची घट झाली.
चौथ्या तिमाहीत नफ्यात ३५ टक्क्यांची वाढ
विशेष म्हणजे, ही घसरण अशा वेळी झाली आहे जेव्हा कंपनीने मार्च २०२६ च्या तिमाहीत अत्यंत चमकदार कामगिरी केली आहे. या तिमाहीत कंपनीचा एकत्रित नफा ११७९ कोटी रुपये झाला, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत (८७१ कोटी) ३५ टक्क्यांनी अधिक आहे.
तर दुसरीकडे कंपनीचं एकूण उत्पन्न ४६ टक्क्यांनी वाढून २०,३०० कोटी रुपयांवर पोहोचलंय. गेल्या वर्षी याच काळात कंपनीचं उत्पन्न १३,८९१ कोटी रुपये होतं.
ब्रोकरेज हाऊसचानं काय म्हटलं?
शेअरमध्ये तात्पुरती घसरण झाली असली, तरी अनेक आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज हाऊसेसनी टायटनवर आपला विश्वास कायम ठेवला आहे. मॉर्गन स्टॅनलीनं त्यांनी टायटनला 'ओव्हरवेट' रेटिंग दिलं असून टार्गेट प्राईज ५,१०२ रुपयांवरून वाढवून ५,२१२ रुपये केली. तर गोल्डमन सॅक्स या ब्रोकरेज हाऊसने 'बाय' रेटिंगसह ५,४०० रुपयांचं टार्गेट दिलंय. बर्नस्टीननं 'आउटपरफॉर्म' रेटिंग कायम ठेवत ५,००० रुपयांचे टार्गेट दिलंय. पंतप्रधानांच्या विधानामुळे सोन्याच्या मागणीवर परिणाम होण्याची भीती गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाली असली, तरी कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत असल्यानं तज्ज्ञ दीर्घकालीन वाढीबाबत सकारात्मक आहेत.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Titan shares plunged after the PM urged citizens to avoid gold purchases. Rekha Jhunjhunwala's holdings saw a significant drop. Despite a strong quarterly profit, Titan and other jewelry stocks suffered losses, impacting investor sentiment.
Web Summary : पीएम द्वारा सोना खरीदने से बचने के आग्रह के बाद टाइटन के शेयर गिर गए। रेखा झुनझुनवाला के शेयरों में भारी गिरावट आई। मजबूत तिमाही लाभ के बावजूद, टाइटन और अन्य ज्वेलरी शेयरों को नुकसान हुआ, जिससे निवेशकों की भावनाएं प्रभावित हुईं।