शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
2
Marathi News LIVE: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
3
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
4
ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, AIMIM नगरसेवकाची मदत; निदाच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
5
'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका
6
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
7
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
8
Jeetu Munda : १९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेलेल्या जीतूचं नशीब फळफळलं; मिळाले १५ लाख
9
जेन-झी: हाऊ डेअर यू? - तुमची हिंमतच कशी झाली?
10
जगभर : राष्ट्राध्यक्ष होण्याआधी शेख मोहम्मद हॉटेलमध्ये होते 'वेटर'!
11
ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
12
इको-फ्रेंडली गणेशमूर्तीच्या विक्रीलाच परवानगी; चित्रशाळांसाठी नोंदणी सक्तीची
13
"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात...
14
"तुमच्या अटी मान्य नाहीत!" इराणच्या उत्तराने ट्रम्प भडकले; होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव
15
दोन हजार 'ड्रोन'ने उलगडला डॉ. आंबेडकरांचा जीवनपट; मुंबईकरांना अक्षरशः भारावून टाकले
16
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
17
चर्चमध्ये जाते, मंदिरातही नमस्कार करते, तृषा कृष्णन नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते? जाणून घ्या
18
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
19
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
20
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 12:55 IST

तमिळनाडूमध्ये, नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्यात 'तमिळ थाई वलथु'च्या आधी 'वंदे मातरम' वाजवल्याने वाद निर्माण झाला आहे. सत्ताधारी टीव्हीकेचा मित्रपक्ष असलेल्या व्हीसीकेनेही मुख्यमंत्री विजय यांच्यावर निशाणा साधला आहे.

थोल थिरुमावलवन यांनी मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यातील प्रोटोकॉलवर आक्षेप घेतला आहे. तमिळनाडूच्या परंपरेनुसार, सरकारी कार्यक्रमांची सुरुवात 'तमिळ थाई वलथू' या गीताने होते. मात्र, विजय यांच्या सोहळ्यात 'वंदे मातरम' आधी गायले, त्यानंतर राष्ट्रगीत आणि शेवटी राज्यगीत वाजवण्यात आले.

"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

थिरुमावलवन यांनी मुख्यमंत्री विजय यांनी त्यांच्या शपथविधी सोहळ्यात आधी 'वंदे मातरम' गायल्याबद्दल टीका केली. ते म्हणाले की, परंपरेनुसार तमिळनाडूतील सरकारी कार्यक्रमांमध्ये सर्वप्रथम 'तमिळ थाई वलथू' गायले जाते. विजय यांच्या सोहळ्यात आधी 'वंदे मातरम', त्यानंतर राष्ट्रगीत आणि मग 'तामिळ थाई वलथू' वाजवण्यात आले. त्यांनी विचारले, "हे राज्यपालांच्या इच्छेनुसार केले की केवळ त्यांना खूश करण्यासाठी?, असा सवाल त्यांनी केला.

कर्जावरून आर्थिक कलगीतुरा 

मुख्यमंत्री विजय यांनी पदभार स्वीकारताच मागील सरकारवर १० लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर उभा केल्याचा आणि तिजोरी रिकामी केल्याचा आरोप केला होता. यावर थिरुमावलवन यांनी त्यांना आर्थिक परिभाषेत प्रत्युत्तर दिले आहे. केवळ एकूण कर्जाचे आकडे दाखवून लोकांमध्ये भीती निर्माण करणे हा राजकीय डाव आहे.  राज्याच्या कर्जाचे मूल्यांकन हे नेहमी राज्याच्या सकल उत्पादन दराच्या प्रमाणात केले पाहिजे. तामिळनाडूचे कर्ज अजूनही १५ व्या वित्त आयोगाच्या मर्यादेत असल्याचा दावा त्यांनी केला.

मुख्यमंत्री विजय यांच्या तीन घोषणांचे कौतुक 

थिरुमावलवन यांनी मुख्यमंत्री विजय यांच्या तीन प्राथमिक घोषणांचे स्वागत केले. यामध्ये अमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेचा सामना करण्यासाठी उपाययोजना, महिलांची सुरक्षा आणि २०० युनिटपर्यंत मोफत वीजपुरवठा यांचा समावेश होता. त्यांनी मुख्यमंत्र्यांना तमिळनाडूच्या जनतेला आश्वासन देण्याचे आवाहन केले की, त्यांचे सरकार पूर्णपणे धर्मनिरपेक्ष असेल.

ते म्हणाले की, 'बदला'ची घोषणा देऊन सत्तेवर आलेल्या विजय यांनी आता आपल्या शब्दांवर स्पष्टीकरण द्यावे, जेणेकरून मित्रपक्षांच्या आणि जनतेच्या मनात कोणतीही शंका राहणार नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Vijay's challenges escalate post CM oath: Allies upset, internal strife.

Web Summary : Chief Minister Vijay faces immediate hurdles. Allies object to protocol changes during his oath. Criticism arose over prioritizing 'Vande Mataram' over the traditional Tamil anthem. Economic disputes and concerns about secular governance also surfaced. He is applauded for initiatives addressing addiction, women's safety and free electricity.
टॅग्स :Thalapathy Vijayथलपती विजयTamilnaduतामिळनाडू