शहरं
Join us  
Trending Stories
1
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
2
Marathi News LIVE: सीमेवर कुंपण घालण्यासाठी बीएसएफला जमीन देण्यास पश्चिम बंगाल सरकारची मान्यता
3
हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
4
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
5
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
6
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
7
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
8
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
9
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
10
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
11
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
12
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
13
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
14
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
15
Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
16
क्रेडिट कार्डने पैसे वाचवता येतात का? करा हजारो रुपयांची बचत; कोणते कार्ड नेमके कशासाठी वापरायचे?
17
शनि जयंती आणि शनि अमावस्या २०२६: साडेसाती-ढय्येचा त्रास संपणार! १६ मे रोजी करा 'हे' विशेष उपाय
18
'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका
19
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
20
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
Daily Top 2Weekly Top 5

जेन-झी: हाऊ डेअर यू? - तुमची हिंमतच कशी झाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 13:53 IST

वाट्टेल ते खपवून घेण्याविषयी 'सहनशील' नसणं हा जेन-झीचा गुण. प्रस्थापित जगातल्या अन्यायांना आव्हान देण्यासाठी ही वृत्ती महत्त्वाची आहे.

-राही श्रु. ग. (सीनिअर रिसर्च फेलो -जवाहरलाल नेहरू विद्यापीठ)
केट अॅलेक्झेंडर यांनी जेन-झीविषयी एक सुंदर सचित्र पुस्तक लिहिलं आहे. त्याचं नावच आहे, 'जनरेशन ब्रेव्ह'. ज्यूड ओर्लाडो यांच्या चित्रांनी सजलेलं हे पुस्तक जेन-झी पिढीला आकार देणाऱ्या मुलामुलींविषयी आहे. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच हे उद्धरण आहे : 'येणाऱ्या काळात जगाचं रूप कसं असेल, याची कल्पना करून मला केवळ उत्साह वाटतो. आजचे तरुण वाट्टेल ते खपवून घेऊ इच्छित नाहीत. ते नव्या गोष्टींसाठी, सर्वांना सामावून घेईल, असं जग निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भविष्यासाठी हे सगळ्यात उत्तम असं मिश्रण आहे.'

जगाशी, समाजाशी जुळवून घेण्यासाठी, अप्रिय, त्रासदायक गोष्टींमुळे न डगमगता पुढे जाण्यासाठी अशा सहनशीलता आवश्यक असते. मात्र, सामाजिक विषमतांच्या संदर्भात जगाकडे पाहताना लक्षात येतं की, अनेकदा ज्यांच्यासोबत अन्याय होत आहे, अशा लोकांना 'सहनशीलते'च्या नावाखाली त्यांच्या अस्तित्वालाच आव्हान देणाऱ्या अनेक गोष्टी त्यांना 'सहन करण्या'चा सल्ला दिला जातो. पारंपरिक भारतीय कुटुंबव्यवस्थेतल्या स्त्रियांना ही सहनशीलता लहानपणापासून शिकवली जाते. सहनशीलतेच्या गौरवीकरणाच्या पार्श्वभूमीवर अॅलेक्झेंडर म्हणतात, वाट्टेल ते खपवून घेण्याविषयी 'सहनशील' नसणं हा जेन-झींचा गुण त्यांना महत्त्वाचा वाटतो. प्रस्थापित जगातल्या विषमता, अन्यायांना आव्हान देण्यासाठी ही वृत्ती महत्त्वाची आहे.

मात्र त्याचबरोबर समानुभूती सर्वसमावेशकता या जेन-झीच्या दुसऱ्या गुणधर्माकडे अॅलेक्झेंडर लक्ष वेधतात. अधिकाधिक लोक, त्यांचे विविध दृष्टिकोन, विविध सामाजिक पार्श्वभूमींतून आलेल्या जाणिवा आणि समाजपरिवर्तनासाठीच्या आणि नवनव्या विचारांविषयी खुलं असणंदेखील तितकंच आवश्यक आहे. आज आहे त्यापेक्षा चांगलं जग घडवण्यासाठीचा आपला काफिला सतरंगी असायला हवा. आपल्या पूर्वग्रहांना आव्हान देणारे नवे विचार, वेगळे समाज आणि समूह यांना आपल्या आयुष्यात जेव्हा महत्त्वाचं स्थान असतं, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण स्वतः आणि आपला समाजदेखील उन्नत होऊ लागतो.

ग्रेटा थनबर्ग हे या जेन-झी कार्यकर्त्यांमधलं महत्त्वाचं नाव. अगदी शाळकरी वयापासून ग्रेटाने पर्यावरणीय न्यायाच्या प्रश्नाकडे जगाचं लक्ष वेधलं. नैसर्गिक संसाधनांना ओरबाडत बेबंद प्रदूषण करणाऱ्या उद्योगांमागच्या साट्यालोट्याच्या भांडवलशाहीला जोवर आव्हान देत नाही, तोवर या पृथ्वीचं भविष्यच काय, वर्तमानदेखील धोक्यात आहे, हे या कार्यकर्त्यांनी हिरिरीने मांडायला सुरुवात केली आणि पाहता-पाहता मोठमोठ्या कंपन्या आणि सरकारांनादेखील ही मंडळी विचारू लागली, 'हाऊ डेअर यू? आमचं आणि येणाऱ्या पिढ्यांचं जगणं अंधारात लोटण्याची तुमची हिंमत कशी झाली?'

'पर्यावरण वाचवा' अशा आशयाची केवळ पोस्टर्स उभी करणं पुरेसं नाही, (खरं तर ते अर्थहीनच आहे!) तर ते बिघडविणाऱ्या सर्वात मोठ्या ताकदींच्या विरोधात संघटित लढा उभारल्याशिवाय पृथ्वी आणि पर्यायाने आपण कोणीच वाचणार नाही, ही महत्त्वाची जाणीव या पिढीने करून दिली. शिवाय, पर्यावरणाचा लढा मानवी न्यायाच्या लढ्याशी जोडलेला आहे, हेदेखील यांनी वारंवार मांडलं. 

स्थानिक समूह, पर्यावरणपूरक लोकपरंपरा आणि आदिवासी जीवनशैलीच्या हक्कांसाठीचे लढे पर्यावरणाच्या लढ्याशी जोडलेले आहेत आणि आक्रमक भांडवलशाहीचा जसा पर्यावरणाला धोका आहे, तसा मानवी जगण्यालादेखील आहे, हे जेन-झी लढ्यांमध्ये मांडलं गेलं. पर्यावरण आणि मानवता यात द्वैत नाही, या जाणिवेमुळेच ग्रेटा आज पॅलेस्टाइनमध्ये होणाऱ्या नरसंहाराविरोधात ठाम उभी आहे. युद्धाच्या सावटामध्ये ना माणूस टिकेल, ना निसर्ग बहरेल, हेच ती धाडसाने जगाला सांगत आहे.
raheeshrutiganesh@gmail.com

English
हिंदी सारांश
Web Title : Gen-Z: How Dare You? - Questioning the Status Quo

Web Summary : Gen-Z challenges societal norms, advocating for inclusivity and environmental justice. Inspired by figures like Greta Thunberg, they demand accountability from corporations and governments, linking environmental struggles with human rights. Their activism highlights the interconnectedness of humanity and nature.
टॅग्स :Greta Thunbergग्रेटा थनबर्गSocialसामाजिकsocial workerसमाजसेवक