आजच्या डिजिटल युगात क्रेडिट कार्ड हे केवळ खर्च करण्याचे साधन राहिले नसून, ते एक महत्त्वाचे आर्थिक नियोजन साधन बनले आहे. त्याचा हुशारीने वापर केल्यास तुम्ही वर्षाकाठी हजारो रुपयांची बचत करू शकता.
'इंटरेस्ट फ्री' चा लाभ
क्रेडिट कार्डचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यावर मिळणारा 'व्याजमुक्त' कालावधी. तुमच्या खरेदीच्या तारखेपासून बिल भरण्याच्या तारखेपर्यंत साधारण ४५ ते ५० दिवस मिळतात. हा पैसा तुम्ही तोपर्यंत लिक्विड फंड किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवून त्यावर व्याज मिळवू शकता आणि देय तारखेला क्रेडिट कार्डचे बिल भरू शकता.
रिवॉर्ड पॉइंट्स, कॅशबॅक
अनेक बँकांनी रिवॉर्ड पॉइंट्स वाढवले आहेत. तुमच्या खर्चाच्या सवयीनुसार कार्ड निवडा. उदाहरणार्थ, जर तुमचा प्रवास जास्त असेल, तर 'ट्रॅव्हल कार्ड' वापरा, ज्यामुळे एअर माईल्स आणि लाउंज एक्सेसचा फायदा मिळेल.
को-ब्रँडेड काईसचा ट्रेंड
सध्या ई-कॉमर्स कंपन्या किंवा पेट्रोल कंपन्यांसोबत बँकांची 'को-ब्रेडेड' काईस लोकप्रिय आहेत. जर तुम्ही ठराविक प्लॅटफॉर्मवरूनच खरेदी करत असाल, तर अशी काईस तुम्हाला ५ ते १० टक्क्यांपर्यंत थेट बचत करून देऊ शकतात.
'ही' क्रेडिट काईस वाचवतील तुमचे पैसे !
आयआरसीटीसी आरबीएल बँक कार्ड : आयआर सीटीसीवर खर्च केल्यास आकर्षक रिवॉर्ड पॉइंट्स, वर्षाला ८ वेळा मोफत एअरपोर्ट लाउंज प्रवेश.
एसबीआय आयआरसीटीसी प्लॅटिनम : रेल्वे तिकीट बुकिंगवरील शुल्कात सूट आणि कॅशबॅकसाठी उत्तम.
रुपे क्रेडिट कार्ड : मेट्रो कार्ड रिचार्ज करताना किंवा बस पास काढताना क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करा आणि रिवॉर्ड पॉइंट्स मिळवा, किराणा सामान आणि ऑनलाइन शॉपिंगवरही जास्तीचे फायदे.
आयडीएफसी फर्स्ट पॉवर प्लस : एचपीसीएल पंपांवर इंधनावर ६.५% पर्यंत बचत.
बीपीसीएल एसबीआय कार्ड ऑक्टेनः इंधन भरण्यावर ७.२५% पर्यंत व्हॅल्यू बॅक.
साधनता अशी बाळगा
तुमच्या कार्डच्या मयदिच्या ३० टक्क्यांहून अधिक वापर टाळा. शुल्क, जीएसटीबद्दल जागरूक राहा. अनेक बँका ठराविक खर्च केल्यावर वार्षिक शुल्क माफ करतात, त्याचा लाभ घ्या. थोडक्यात, क्रेडिट कार्ड हे दुधारी तलवार आहे. जर तुम्ही शिस्तीने व वेळेवर पैसे भरण्याची तयारी ठेवली, तर ते तुमच्यासाठी बचतीचे उत्तम साधन ठरेल.
क्रेडिट कार्डांचा 'मिनिमम ड्यू' भरावा की नाही?
क्रेडिट कार्डाचे बिल आल्यावर मिनिमम ड्यू भरला म्हणजे उरलेल्या रकमेवर व्याज लागणार नाही असा अनेकांचा समज असतो. मात्र, हा सर्वात मोठा गैरसमज आहे. क्रेडिट कार्डवरील व्याजदर हे वार्षिक ३६% ते ४८% पर्यंत असू शकतात.
जेव्हा तुम्ही फक्त किमान रक्कम भरता, तेव्हा तुमची 'लेट फी' वाचते, पण उर्वरित ९५% रकमेवर दररोजच्या हिशेबाने चक्रवाढ व्याज सुरू होते. मिनिमम ड्यू भरणे ही केवळ एक तात्पुरती सोय आहे.
फसवणूक सुरक्षा व विमा
काही क्रेडिट कार्डवर 'झिरो लॉस्ट कार्ड लायबिलिटी' सुविधा मिळते. कार्ड हरवल्यास किंवा सायबर फ्रॉड झाल्यास, वेळेत कळवल्यास तुमचे नुकसान टाळता येते. याशिवाय अनेक काईसवर अपघाती विमा आणि खरेदी संरक्षणदेखील मिळते. तुमचे क्रेडिट कार्डचे बिल दरमहा वेळेवर भरल्यास तुमचा सिबिल स्कोअरही सुधारतो.
Web Summary : Credit cards offer savings through interest-free periods, rewards, and co-branded deals. Choose cards wisely based on spending habits for travel or fuel benefits. Timely payments and awareness of fees are crucial. Avoid paying only the minimum due to high interest rates. Credit cards, used responsibly, can be a powerful tool for financial savings.
Web Summary : क्रेडिट कार्ड ब्याज मुक्त अवधि, पुरस्कार और सह-ब्रांडेड सौदों के माध्यम से बचत प्रदान करते हैं। यात्रा या ईंधन लाभ के लिए खर्च करने की आदतों के आधार पर कार्ड बुद्धिमानी से चुनें। समय पर भुगतान और शुल्क के बारे में जागरूकता महत्वपूर्ण है। उच्च ब्याज दरों के कारण केवल न्यूनतम राशि का भुगतान करने से बचें। जिम्मेदारी से उपयोग किए जाने पर क्रेडिट कार्ड वित्तीय बचत के लिए एक शक्तिशाली उपकरण हो सकता है।