शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
2
Marathi News LIVE: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
3
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
4
ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, AIMIM नगरसेवकाची मदत; निदाच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
5
'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका
6
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
7
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
8
Jeetu Munda : १९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेलेल्या जीतूचं नशीब फळफळलं; मिळाले १५ लाख
9
जेन-झी: हाऊ डेअर यू? - तुमची हिंमतच कशी झाली?
10
जगभर : राष्ट्राध्यक्ष होण्याआधी शेख मोहम्मद हॉटेलमध्ये होते 'वेटर'!
11
ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
12
इको-फ्रेंडली गणेशमूर्तीच्या विक्रीलाच परवानगी; चित्रशाळांसाठी नोंदणी सक्तीची
13
"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात...
14
"तुमच्या अटी मान्य नाहीत!" इराणच्या उत्तराने ट्रम्प भडकले; होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव
15
दोन हजार 'ड्रोन'ने उलगडला डॉ. आंबेडकरांचा जीवनपट; मुंबईकरांना अक्षरशः भारावून टाकले
16
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
17
चर्चमध्ये जाते, मंदिरातही नमस्कार करते, तृषा कृष्णन नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते? जाणून घ्या
18
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
19
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
20
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
Daily Top 2Weekly Top 5

Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 12:35 IST

West Bengal Politics: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जींना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. 

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी राजकीयदृष्ट्या एकाकी पडताना दिसत आहेत. राज्यातील इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि डाव्या आघाडीने ममता बॅनर्जींसोबत युती करण्यास स्पष्ट नकार दिला. निवडणुकीच्या निकालानंतर तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला असतानाच, मित्रपक्षांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे ममता बॅनर्जींच्या जखमेवर मीठ चोळले गेले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांनी आता स्वतंत्रपणे आपली वाटचाल करण्याचा निर्णय घेतला. तृणमूल काँग्रेससोबत गेल्यामुळे आपल्या हक्काच्या मतांचे नुकसान होत असल्याचे या दोन्ही पक्षांचे मत बनले आहे. काँग्रेस नेत्यांच्या मते, तृणमूल काँग्रेसची कार्यपद्धती आणि राज्यातील भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे जनतेमध्ये नाराजी आहे. अशा परिस्थितीत ममता बॅनर्जींसोबत राहिल्यास काँग्रेसलाही त्याचा फटका बसू शकतो. दुसरीकडे, डाव्या पक्षांनी सुरुवातीपासूनच तृणमूलच्या हिंसक राजकारणावर टीका केली. पराभवानंतर आता ममता बॅनर्जींना साथ देण्याऐवजी आपला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय डाव्यांनी घेतला आहे. मोहम्मद सलीम यांच्या नेतृत्वाखालील सीपीएमनेही ममता बॅनर्जी यांची विनंती पूर्णपणे फेटाळून लावली. भाजपविरोधातील लढ्यात तृणमूल काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणे कदापि शक्य नाही, असे ते म्हणाले.

दरम्यान, एकीकडे भारतीय जनता पक्ष बंगालमध्ये आपली पाळेमुळे घट्ट करत आहे, तर दुसरीकडे ममता बॅनर्जींचे जुने मित्र त्यांना सोडून जात आहेत. राष्ट्रीय राजकारणात 'इंडिया' आघाडीचे नेतृत्व करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या ममता बॅनर्जींसाठी त्यांच्या स्वतःच्या राज्यात झालेली ही कोंडी चिंतेची बाब ठरत आहे. 

काँग्रेस आणि डाव्यांच्या या भूमिकेमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसला मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागू शकतो. विरोधकांची मते विभागली जाण्याचा फायदा भाजपला मिळू नये, यासाठी ममता बॅनर्जींना पुन्हा एकदा नवीन रणनीती आखावी लागणार आहे. मात्र, सध्या तरी ममता बॅनर्जी या राजकीय मैदानात एकाकी पडल्याचे चित्र दिसत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mamata Banerjee Isolated as Allies Abandon Her After Election Loss

Web Summary : After a major defeat, Mamata Banerjee faces isolation as Congress and Left parties refuse alliances. They cite TMC's methods and corruption allegations as reasons for distancing themselves, aiming to rebuild their base independently. This compounds Banerjee's challenges amid BJP's growing influence in Bengal.
टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाPoliticsराजकारणcongressकाँग्रेसwest bengalपश्चिम बंगाल