शहरं
Join us  
Trending Stories
1
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
2
Marathi News LIVE: सीमेवर कुंपण घालण्यासाठी बीएसएफला जमीन देण्यास पश्चिम बंगाल सरकारची मान्यता
3
हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
4
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
5
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
6
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
7
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
8
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
9
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
10
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
11
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
12
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
13
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
14
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
15
Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
16
क्रेडिट कार्डने पैसे वाचवता येतात का? करा हजारो रुपयांची बचत; कोणते कार्ड नेमके कशासाठी वापरायचे?
17
शनि जयंती आणि शनि अमावस्या २०२६: साडेसाती-ढय्येचा त्रास संपणार! १६ मे रोजी करा 'हे' विशेष उपाय
18
'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका
19
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
20
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
Daily Top 2Weekly Top 5

Jeetu Munda : १९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेलेल्या जीतूचं नशीब फळफळलं; मिळाले १५ लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 13:05 IST

Jeetu Munda : जीतू मुंडा असं या व्यक्तीचं नाव असून ते ओडिशाचे रहिवासी आहेत. याच दरम्यान आता जीतू यांचं नशीब पालटलं आहे,  त्यांना लाखो रुपयांची मदत मिळाली आहे.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील एका व्हिडिओने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती आपल्या बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत जात असल्याचं पाहायला मिळालं. आपल्या मृत बहिणीच्या खात्यात असलेले १९,००० रुपये काढण्यासाठी त्या व्यक्तीला बहिणीचा मृत्यू झाल्याचा पुरावा बँकेला द्यायचा होता. जीतू मुंडा असं या व्यक्तीचं नाव असून ते ओडिशाचे रहिवासी आहेत. याच दरम्यान आता जीतू यांचं नशीब पालटलं आहे,  त्यांना लाखो रुपयांची मदत मिळाली आहे.

जीतू मुंडा यांना त्यांच्या बहिणीच्या खात्यातील १९ हजार रुपये काढायचे होते. त्यांच्या बहिणीचा मृत्यू काही महिन्यांपूर्वीच झाला होता. जेव्हा ते बँकेत गेले, तेव्हा बँकेकडून सांगण्यात आलं की, "बहिणीला घेऊन या, तरच पैसे मिळतील." या उत्तरामुळे हताश झालेल्या जीतू यांनी चक्क बहिणीचा सांगाडा बाहेर काढला आणि कित्येक किलोमीटर तो खांद्यावर घेऊन जाऊन बँक गाठली. हेच दृश्य इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झालं होतं.

जीतू मुंडा यांना मिळाली लाखो रुपयांची मदत

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप आणि सहानुभूती व्यक्त करण्यात आली. बँकेतील जमा रक्कमेव्यतिरिक्त अनेक संस्थांनी त्यांना आर्थिक मदत केली आहे. यामध्ये सर्वात मोठं नाव 'फिजिक्स वाला' CEO अलख पांडे यांचं आहे, त्यांनी जीतू यांना १० लाख रुपयांची मदत दिली आहे. तसेच, राजस्थानच्या कृषी मंत्र्यांनीही आपला एका महिन्याचा पगार (सुमारे १.४५ लाख रुपये) जीतू यांना दिला आहे. असे एकूण १५ लाख जीतू यांना मिळाले आहेत. 

बँक मॅनेजरचा खुलासा

या प्रकरणाबाबत जेव्हा बँक मॅनेजरला विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी आपली बाजू मांडताना सांगितलं की, "मी फक्त कागदपत्रं मागितली होती, सांगाडा आणायला सांगितला नव्हता." मात्र, जीतू मुंडा आपल्या दाव्यावर ठाम आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, मॅनेजरने स्पष्टपणे "बहिणीला घेऊन या" असंच सांगितलं होतं, म्हणूनच त्यांना हे पाऊल उचलावं लागलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Man Carries Sister's Remains to Bank, Fortune Changes, Gets $18,000

Web Summary : Jeetu Munda, forced to carry his sister's remains to a bank for $230, received $18,000 in aid after the video went viral. Physics Wallah CEO and a Rajasthan minister contributed significantly. The bank manager denies asking for the body.
टॅग्स :bankबँकMONEYपैसा