Join us
Daily Top 2Weekly Top 5

Trisha Krishnan: तृषा कृष्णनने लग्न का केलं नाही? बिजनेसमॅनसोबत झालेला साखरपुडा, लग्नही ठरलेलं, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 12:02 IST

1 / 9
साऊथ अभिनेत्री तृषा कृष्णनचं तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेता थलपती विजय यांच्यासोबत अफेअर असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
2 / 9
पण, ४३ वर्षीय तृषाने अद्याप लग्न का केलं नाही? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. खरं तर तृषाचा एका बिजनेसमॅनशी साखरपुडा झाला होता. मात्र त्यांचं लग्न होऊ शकलं नाही.
3 / 9
तृषाने २०१५ साली करिअरच्या शिखरावर असताना बिजनेसमॅन वरुण मनियनसोबत साखरपुडा केला होता. ते लग्नही करणार होते.
4 / 9
मात्र साखरपुड्यानंतर ५ महिन्यांतच त्यांचं लग्न मोडलं. तेव्हा तृषाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
5 / 9
साखरपुडा मोडल्यानंतर तृषा कृष्णन अभिनेता राणा दग्गुबतीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या.
6 / 9
तृषा कृष्णन आणि राणा दग्गुबतीचा एक फोटोही व्हायरल झाला होता. पण त्या दोघांनी कधीच त्यांचं नातं ऑफिशियल केलं नव्हतं.
7 / 9
आता तृषा कृष्णनच्या मुख्यमंत्री विजय थलपतीसोबत अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांचं अफेअर असल्याचं बोललं जात आहे.
8 / 9
थलपती विजय यांच्या तामिळनाडू मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यात तृषा उपस्थित होती.
9 / 9
लग्नाबद्दल तृषा म्हणाली होती की 'माझा घटस्फोटावर विश्वास नाही. लग्नानंतर मी घटस्फोट घेऊ इच्छित नाही. माझ्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत, जे लग्न झालेलं असूनही आनंदी नाहीत'.
टॅग्स :थलपती विजयसेलिब्रिटी