Deputy CM Eknath Shinde: भाजपासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच कमळ फुलले आहे. आपले लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने ममता दीदींना पराभवाची 'झालमुडी' दिली आहे. गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या जनतेने पश्चिम बंगालमध्ये खऱ्या लोकशाहीची स्थापना केली आहे. त्यांनी विकास, प्रगती, स्थैर्य आणि शांततेसाठी मतदान केले आहे. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आहे. या शताब्दी वर्षात पूजनीय श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जन्मभूमीत भाजपाचा विजय हा सर्वार्थाने ऐतिहासिक आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
देशभरात पाच राज्ये आणि महाराष्ट्रातील दोन पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाचे निकाल समोर येत आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सुरुवातीला जे कल हाती येत आहेत, त्यानुसार भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. ममता बॅनर्जी यांचे सरकार कोसळत असल्याचे पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगाल येथे सत्तांतर होणार असल्याचे चित्र आहे. यातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सवर पोस्ट करत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचे अभिनंदन केले.
पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी गेल्या दहा वर्षांपासून ममता दीदींचा बालेकिल्ला मोडून काढण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. अमित शाह हे भाजपाचे चाणक्य आहेत, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. सर्व भाजप कार्यकर्त्यांनी दडपशाहीला न जुमानता दृढनिश्चयाने लढा दिला आहे. त्यामुळे, भाजप कार्यकर्त्यांचेही अभिनंदन. या निवडणूक प्रचारादरम्यान ममता दीदींनी भाजपा, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीची टीका केली होती. जनतेने मतपेटीच्या माध्यमातून या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. आता, भाजपा सरकार पश्चिम बंगालच्या सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून त्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर देईल. भाजपाच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये आता विकासाच्या एका नव्या पर्वाचा उदय होत आहे. या डबल-इंजिन सरकारमुळे पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन नक्कीच वेगाने धावेल.
भाजपाला कामाख्या देवीचा आशीर्वाद लाभला
भाजपाला पश्चिम बंगालच्या काली माता आणि आसामच्या कामाख्या देवी यांचा आशीर्वाद लाभला आहे. 'आसाममध्ये विजय सोपा आहे, फक्त भाजप हीच ओळख आहे' ही घोषणा पुन्हा एकदा खरी ठरली आहे. भारतीय जनता पक्ष आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येत आहे. आसामच्या नागरिकांनी देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खंबीर गृहमंत्री अमित शाह यांच्या दूरदृष्टीवर पुन्हा एकदा आपला पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. जनतेने मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांच्या विकास धोरणांवर आणि कार्यावर विश्वास दर्शवला आहे. त्यामुळे, माझे मित्र हिमंता बिस्वा सरमा यांचे अभिनंदन, असे एकनाथ शिंदे यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. याबाबतही एकनाथ शिंदे यांनी एक्सवरून प्रतिक्रिया दिली. दोन लाखांहून अधिक मताधिक्याने निवडून आल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे हार्दिक अभिनंदन. बारामतीकरांनी सुनेत्राताईंना विक्रमी मताधिक्याने विजयी करत अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. स्वर्गीय अजित पवार यांनी बारामतीच्या विकासाचे आणि प्रगतीचे पाहिलेले स्वप्न सुनेत्राताई पूर्ण करतील, यात शंका नाही, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
Web Summary : Deputy CM Eknath Shinde congratulated Modi and Shah on BJP's West Bengal victory. He stated that Bengal's public chose progress and stability, paving the way for rapid development under a BJP government. He also acknowledged BJP's wins in Assam and Baramati.
Web Summary : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने पश्चिम बंगाल में भाजपा की जीत पर मोदी और शाह को बधाई दी। उन्होंने कहा कि बंगाल की जनता ने प्रगति और स्थिरता को चुना, जिससे भाजपा सरकार के तहत तेजी से विकास का मार्ग प्रशस्त होगा। उन्होंने असम और बारामती में भाजपा की जीत को भी स्वीकार किया।