कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपने जोरदार मुसंडी मारली असून, बहुमताचा आकडा पार करत विजयाची पहिली अधिकृत मोहोर उमटवली आहे. ताज्या कलानुसार, भाजप १९४ जागांवर तर तृणमूल काँग्रेस ८७ जागांवर आघाडीवर आहे. भाजपने आतापर्यंत ४ जागा जिंकल्या असून तृणमूलला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला आहे. यातच वातावरण तणावाचे असताना ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी हे दोघेही सध्या भवानीपूरच्या मतमोजणी केंद्रावर समोरासमोर आले आहेत.
बंगालमधील विजयाचे खाते उघडताना मोंटेश्वर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सैकत पांजा यांनी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराचा १४,७९८ मतांनी पराभव केला आहे. या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.
नंदीग्राममध्ये सुवेंदू अधिकारींची मोठी आघाडीनंदीग्राम या अतिशय संवेदनशील जागेवर १० व्या फेरीअखेर भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी १४,६३१ मतांची भक्कम आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे, भवानीपूरमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सुवेंदू अधिकारी यांच्यापेक्षा सुमारे ७ हजार मतांनी पुढे आहेत. विशेष म्हणजे, ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी हे दोघेही सध्या भवानीपूरच्या मतमोजणी केंद्रावर समोरासमोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
भाजप कार्यालयात उत्सवी वातावरणकोलकात्याच्या सॉल्ट लेकस्थित भाजप कार्यालयात विजयाचा जल्लोष सुरू झाला आहे. सुनील बन्सल, बिप्लव कुमार देव, मंगल पांडे, अमित मालवीय आणि निशिकांत दुबे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ते गुलालाची उधळण करत 'जय श्री राम'च्या घोषणा देत आहेत.
निवडणुकीची सद्यस्थिती:
भाजप: १९४ (आघाडीवर), ४ (विजयी)
टीएमसी: ८७ (आघाडीवर), १ (विजयी)
फालता जागा: २१ मे रोजी पुनर्मतदान होणार.
Web Summary : BJP leads in West Bengal. Mamata Banerjee and Suvendu Adhikari are at the Bhabanipur counting center amidst high tension. BJP workers celebrate.
Web Summary : पश्चिम बंगाल में भाजपा आगे। ममता बनर्जी और सुवेंदु अधिकारी भवानीपुर मतगणना केंद्र पर तनाव के बीच। भाजपा कार्यकर्ताओं का जश्न।