शहरं
Join us  
Trending Stories
1
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसढसा रडला होता...
2
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
3
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
4
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
5
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
6
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
7
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
8
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
9
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
10
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
11
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
12
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
13
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
14
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
15
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
16
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
17
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
18
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
19
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
20
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
Daily Top 2Weekly Top 5

विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 16:03 IST

Tamil Nadu Election Results 2026 : कोलाथूर मतदारसंघातून मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा पराभव. थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाचे व्ही. एस. बाबू यांनी केला पराभव.

चेन्नई: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालात आज भारतीय राजकारणाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आणि द्रमुक (DMK) प्रमुख एम. के. स्टॅलिन यांचा त्यांच्या हक्काच्या कोलाथूर मतदारसंघातून पराभव झाला आहे. अभिनेता थलापती विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' पक्षाचे उमेदवार व्ही. एस. बाबू यांनी स्टॅलिन यांचा पराभव करत ऐतिहासिक विजय नोंदवला आहे.

स्टॅलिन यांच्या बालेकिल्ल्याला भगदाडकोलाथूर हा स्टॅलिन यांचा अभेद्य बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, चित्रपटसृष्टीतून राजकारणात आलेल्या विजय यांच्या लाटेने मुख्यमंत्र्यांनाच घरचा रस्ता दाखवला आहे. व्ही. एस. बाबू यांनी सुरुवातीच्या फेरीपासूनच घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत स्टॅलिन यांना पराभूत केले. या पराभवामुळे द्रमुकच्या गोटात स्मशानशांतता पसरली असून, तामिळनाडूत नवीन राजकीय युगाची नांदी मानली जात आहे. स्टॅलिन यांचा सुमारे ८००० मतांनी पराभव झाला आहे. 

विजय यांची 'किंगमेकर' ते 'किंग' अशी झेपआपल्या पहिल्याच निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना पराभूत करण्याचे बळ दाखवत विजय यांच्या TVK पक्षाने तामिळनाडूच्या राजकारणात ५० वर्षांपासून असलेल्या प्रस्थापित द्रविडी पक्षांच्या DMK आणि AIADMK सत्तेला सुरुंग लावला आहे. स्टॅलिन यांचा पराभव हा केवळ एका जागेचा पराभव नसून, तो द्रमुकच्या विचारधारेला मिळालेला कौल असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

राज्यात राजकीय अस्थिरतेची शक्यता?TVK बहुमताच्या जवळ असल्याने आणि स्वतः मुख्यमंत्री पराभूत झाल्याने, एम. के. स्टॅलिन यांना आता नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. टीव्हीके आणि काँग्रेसने सत्तास्थापनेची तयारी सुरु केली आहे. यास स्टॅलिन पाठिंबा देतात का, याकड़े सर्वांचे लक्ष लागले आहे. टीव्हीके सध्या १०५ जागांवर आघाडीवर आहे. बहुमतासाठी ११७ जागांची गरज आहे. यामुळे तामिळनाडूमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झालेली असून  राजकीय अस्थिरतेची शक्यता आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Stalin Loses Seat! Vijay's TVK Shocks Tamil Nadu Politics.

Web Summary : In a stunning upset, Tamil Nadu Chief Minister M.K. Stalin lost his Kolathur seat to TVK's V.S. Babu. Vijay's party is close to majority, potentially ending DMK's reign and causing political instability. Stalin may resign, with TVK and Congress vying for power.
टॅग्स :TamilnaduतामिळनाडूAssembly Election Resultsविधानसभा निवडणूक निकाल २०२६Electionनिवडणूक 2026Thalapathy Vijayथलापती विजय