Join us
Daily Top 2Weekly Top 5

"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 15:42 IST

एका शाळेचं फी स्ट्रक्चर व्हायरल झालं असून त्याने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. ही घटना एका नर्सरीच्या मुलाच्या फीची आहे, जी एखाद्या मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेज किंवा एमबीए कोर्सच्या फीलाही टक्कर देत आहे

आजच्या महागाईच्या काळात घर चालवण्यासोबतच मुलांचं शिक्षण पूर्ण करणं हे सोपं काम राहिलेलं नाही. आता शिक्षण घेणं ही एक 'लक्झरी' बनत चालली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका शाळेचं फी स्ट्रक्चर व्हायरल झालं असून त्याने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. ही घटना एका नर्सरीच्या मुलाच्या फीची आहे, जी एखाद्या मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेज किंवा एमबीए कोर्सच्या फीलाही टक्कर देत आहे. शाळांमध्ये ३-४ वर्षांच्या मुलाला ABCD आणि 'ट्विंकल-ट्विंकल लिटल स्टार' शिकवण्यासाठी लाखो रुपये घेतले जात आहेत. व्हायरल पोस्टमध्ये नर्सरीच्या विद्यार्थ्याची वार्षिक फी २.५ लाख रुपयांहून अधिक असल्याचं दिसत आहे.

सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टमध्ये एका खासगी शाळेचं फी स्ट्रक्चर दाखवण्यात आलं आहे, ज्यामध्ये नर्सरी किंवा किंडरगार्टनसाठी वर्षाला तब्बल २.२ ते २.५ लाख रुपये फी सांगण्यात आली आहे. याचा अर्थ लहान मुलांच्या शिक्षणासाठी दरमहा २० ते २१ हजार रुपये खर्च करावे लागत आहेत. हा आकडा पाहून लोक म्हणत आहेत की, अनेकदा एमबीए किंवा प्रोफेशनल कोर्सेसची फी सुद्धा इतकी नसते.

ही पोस्ट व्हायरल होताच सोशल मीडियावर लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत. कोणी लिहिलं की, "आता ABCD शिकणं देखील महाग झालं आहे", तर कोणी म्हटलं की "या शाळा नसून फाईव्ह स्टार हॉटेल बनलं आहेत." अनेक युजर्सनी प्रश्न उपस्थित केला आहे की, "खरंच इतकी फी आवश्यक आहे का, की हे फक्त पैसे कमावण्याचं साधन बनले आहे?"

मध्यमवर्गीय कुटुंबांना फटका

अशा प्रकारच्या फीचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गीय कुटुंबांना बसत आहे. अनेक रिपोर्ट्समधून समोर आलं आहे की, वाढत्या फीमुळे पालकांना मुलांच्या सुरुवातीच्या शिक्षणासाठीही मोठा खर्च करावा लागत आहे. काही लोक तर असंही म्हणत आहेत की, त्यांना मुलांची फी भरण्यासाठी कर्ज घ्यावं लागत आहे.

शिक्षण की 'लक्झरी सर्व्हिस'?

या संपूर्ण प्रकरणाने एक मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. शाळा आता शिक्षण देण्याऐवजी एक प्रकारची 'लक्झरी सर्व्हिस' बनत चालल्या आहेत का? अनेक लोकांचं असं मत आहे की, खासगी शाळा चांगल्या सुविधांसह ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आणि उत्तम पायाभूत सुविधा देतात. परंतु प्रश्न असा आहे की, या सुविधांच्या नावाखाली इतकी जास्त फी आकारणं योग्य आहे का?

लोकांची मतं

या मुद्द्यावर लोकांची मतं वेगवेगळी आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की, जर शाळा उत्तम सुविधा देत असतील, तर फी जास्त असणं स्वाभाविक आहे. तर दुसरीकडे, अनेक लोक याला पूर्णपणे चुकीचे मानतात आणि शिक्षण सर्वांसाठी स्वस्त आणि सुलभ असावं असं म्हणतात. या व्हायरल पोस्टनंतर अनेकांनी सरकार आणि शिक्षण व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shocking! Parents aghast at ₹2.5 lakh fee for Senior KG.

Web Summary : A viral fee structure showing ₹2.5 lakh annual fees for Senior KG is shocking parents. Critics question if such high fees are justified, impacting middle-class families who may need loans for education, blurring the line between education and luxury services.
टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाशिक्षण