IPL Points Table : आयपीएल २०२६ स्पर्धेतील प्लेऑफ्सची शर्यत चांगलीच चुरशीची झाली आहे. रविवारी झालेल्या डबल हेडरच्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सने घरच्या मैदानात खेळणाऱ्या ऑरेंज आर्मीची सलग पाच विजयाची मालिका खंडित करत प्लेऑफ्सची आस कायम ठेवली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघाने टेबल टॉपर पंजाब किंग्सला पराभवाचा दणका देत १२ गुणांच्या कमाईसह चार संघांची बरोबरी केली आहे. इथं जाणून घेऊयात गुणतालिकेत कोणता संघ कितव्या स्थानी आहे? प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकण्यासाठी कोणत्या संघासमोर काय आव्हान असेल? यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पंजाब किंग्स अव्वल
अहमदाबादच्या मैदानातील गुजरात टायटन्स विरुद्धच्या पराभवानंतर पंजाब किंग्सचा संघ अजूनही गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. ९ सामन्यानंतर पंजाबच्या संघाने ६ विजय २ पराभव आणि एका अनिर्णित सामन्यासह १३ गुण आपल्या खात्यात जमा केले आहेत. +०.८५५ धावगतीसह ते प्लेऑप्सच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. उर्वरित पाच सामन्यांपैकी दोन विजयासह ते प्लेऑफ्सचं तिकीट पक्के करू शकतात.
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
- सनरायझर्स हैदराबाद ४९वा सामना - ६ मे
- दिल्ली कॅपिटल्स ५५वा सामना- ११ मे
- मुंबई इंडियन्स ५८वा सामना- १४ मे
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ६१ वा सामना- १७ मे
- लखनौ सुपर जाएंट्स ६८ वा सामना-२३ मे
गत चॅम्पियन RCB साठीही सोपं समीकरण
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ ९ सामन्यांतील ६ विजय, ३ पराभवासह +१.४२० धावगतीसह १२ गुणांची कमाई करून दुसऱ्या स्थानावर आहे. प्लेऑफ्समधील आपले स्थान सुरक्षित करण्यासाठी त्यांना उर्वरित पाच सामन्यात किमान दोन सामने जिंकायचे आहेत.
- लखनौ सुपर जाएंट्स ५०वा सामना- ७ मे
- मुंबई इंडियन्स ५४वा सामना-१० मे
- कोलकाता नाईट रायडर्स ५७वा सामना- १३ मे
- पंजाब किंग्स ६१वा सामना- १७ मे
- सनरायझर्स हैदराबाद ६७वा सामना- २२ मे
प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचं ट्विस्ट! आघाडीच्या पाचमधील ४ संघाच्या खात्यात समान गुण
सनरायझर्स हैदराबाद १० सामन्यांतील ६ विजय, ४ पराभवासह +०.६४४ नेट रनरेटसह १२ गुणांची कमाई केली आहे. ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत. राजस्थान रॉयल्सच्या संघाने १० सामन्यानंतर ६ विजय, ४ पराभवासह +०.५१० धावगतीसह चौथ्या तर गुजरात टायटन्सचा संघ १० सामन्यांत ६ विजय, ४ पराभवासह -०.१४७) आघाडीच्या पाचमध्ये आहे. त्यामुळे आघाडीवर असलेल्या पंजाब किंग्ससह टॉप ५ मधील चार संघात तगडी फाईट असल्याचे दिसते.
CSK, DC आणि KKR अजूनही स्वबळावर टिकून, पण...
चेन्नई सुपर किंग्सचा संघ ९ सामन्यांत ४ विजय, ५ पराभवासह +०.००५ धावगतीसह ८ गुणांसह सहाव्या दिल्ली कॅपिटल्स एवढ्याच सामन्यानंतर ४ विजय, ५ पराभवासह -०.८९५ धावगतीसह ८ गुणांसह सातव्या तर कोलकाता नाईट रायडर्स ९ सामन्यानंतर ३ विजय, ५ पराभव आणि एका अनिर्णित सामन्यासह ७ गुणांसह प्लेऑफ्सच्या शर्यतीत आठव्या क्रमांकावर आहे. CSK, DC आणि KKR अजूनही स्वबळावर टिकून असले तरी टॉप ४ मधील दावेदारी पक्की करण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
MI आणि LSG तळाला!
मुंबई इंडियन्सच्या संघाने ९ सामन्यात २ विजयासह -०.८०३ धावगतीसह नवव्या तर लखनौ सुपर जायंट्स ८ सामन्यानंतर २ विजय, ६ पराभवासह -१.१०६ धावगतीसह सर्वात तळाला आहे. दोन्ही संघ सोमवारी समोरासमोर येणार आहेत. या सामन्यात MI पराभूत झाले तर त्यांचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात येईल. दुसरीकडे लखनौच्या पदरी पराभव पडला तर तर त्यांचे स्वबळावर प्लेऑफ्स गाठण्याचं गणित बिघडेल.
Web Summary : The IPL 2026 playoff race intensifies! Punjab Kings leads, but several teams are close. RCB, SRH, RR, and GT are strong contenders. CSK, DC, and KKR still have a chance, while MI and LSG struggle at the bottom.
Web Summary : आईपीएल २०२६ प्लेऑफ की दौड़ रोमांचक! पंजाब किंग्स आगे, पर कई टीमें करीब। आरसीबी, एसआरएच, आरआर, और जीटी मजबूत दावेदार। सीएसके, डीसी, और केकेआर के पास मौका, एमआई और एलएसजी नीचे।