शहरं
Join us  
Trending Stories
1
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसढसा रडला होता...
2
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
3
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
4
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
5
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
6
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
7
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
8
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
9
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
10
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
11
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
12
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
13
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
14
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
15
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
16
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
17
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
18
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
19
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
20
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
Daily Top 2Weekly Top 5

हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 15:51 IST

Assam Assembly Election 2026 Result: काँग्रेसचे आसाममधील प्रमुख नेते आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय गौरव गोगोई यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. गौरव गोगोई यांना जोरहाट विधानसभा मतदारसंघात तब्बल २३ हजारांहून अधिक मतांनी पराभवाचा सामना करावा लागला.

आसाम विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये काँग्रेसला जबर धक्का बसला आहे. भाजपानेआसाममधील विधानसभेच्या १२६ जागांपैकी १०० जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान, काँग्रेससोबतच काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनाही या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामध्ये काँग्रेसचे आसाममधील प्रमुख नेते आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय गौरव गोगोई यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. गौरव गोगोई यांना जोरहाट विधानसभा मतदारसंघात तब्बल २३ हजारांहून अधिक मतांनी पराभवाचा सामना करावा लागला.

आसाममधील विधानसभा निवडणुकीदरम्यान, राज्या काँग्रेसचं नेतृत्व करत असलेल्या गौरव गोगई यांनी भाजपाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना जोरदार आव्हान दिले होते. दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा वाकयुद्धही रंगले होते. दरम्यान, सत्ता आल्यास काँग्रेसकडून मुख्यमंत्रि‍पदाचे दावेदार असलेल्या गौरव गोगोई यांनी जोरहाट विधानसबा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तिथे गौरव गोगोईंसमोर भाजपाचे हितेंद्रनाथ गोस्वामी यांचे आव्हान होते. दरम्यान, आज झालेल्या मतमोजणीमध्ये गौरव गोगोई हे सुरुवातीपासूनच पिछाडीवर पडले होते. अखेरीस हितेंद्रनाथ गोस्वामी यांनी गौरव गोगोई यांचा तब्बल २३ हजार १८२ मतांनी पराभव केला गौरव गौगोई यांचा झालेला पराभव हा आसाममध्ये काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Gaurav Gogoi, Rahul Gandhi's aide, loses Assam election on home ground.

Web Summary : Congress faces setback in Assam; Gaurav Gogoi suffers a major defeat in Jorhat by over 23,000 votes. Despite challenging Chief Minister Sarma, Gogoi, a CM contender, lost to BJP's Hitendranath Goswami, a significant blow for Congress.
टॅग्स :Assembly Election Resultsविधानसभा निवडणूक निकाल २०२६Assamआसामcongressकाँग्रेसBJPभाजपा