'सैराट' या मराठीतील सर्वात गाजलेल्या सिनेमाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. सिनेमातील आर्ची, परश्या, लंगड्या, सल्या हे सगळेच पात्र गाजले. सल्या या भूमिकेत दिसलेल्या अभिनेता अरबाज शेखने नुकताच निकाह केला आहे. त्याने पत्नीसोबतचे वेडिंग फोटो शेअर केले असून त्यावर इंडस्ट्रीतील कलाकारांनी कमेंट करत त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकु राजगुरुनेही त्याच्या पोस्टवर कमेंट केली आहे.
अभिनेता अरबाज शेखने गर्लफ्रेंड सिमरनशी निकाह केला. यावेळी त्यांची क्रीम रंगाची थीम केली होती. अरबाजने डिझायनर शेरवानी परिधान केली होती ज्यात तो हँडसम दिसत आहे. तर सिमरनने त्याच रंगाची सुंदर डिझायनर साडी नेसली. त्यावर तिने भरजरी दागिने, केसात गजरा माळला होता. अगदी आलिया भटच्या वेडिंग लूकसारखाट सिमरनचा लूक दिसत आहे. तसंच दोघांनी हातात गुलाबाचा गुच्छ घेतलेला फोटोही पोस्ट केला आहे.
अरबाजने या पोस्टला 'जस्ट अस' असं कॅप्शन दिलं आहे. या पोस्टवर रिंकु राजगुरुने हार्ट इमोजी कमेंट केले आहेत. तसंच भाग्यश्री मोटे, प्रतीक लाड या कलाकार मित्रांनीही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. आता अरबाजच्या निकाहसाठी लंगड्या, परश्या यांनीही हजेरी लावली की नाही हे लवकरच कळेल. अरबाज शेख नुकताच नागराज मंजुळेंच्या 'मटका किंग' या गाजत असलेल्या सीरिजमध्ये दिसला. यामध्ये त्याची छोटी भूमिका होती.
Web Summary : Arbaaz Sheikh, famed as 'Salya' in Sairat, recently married Simran in a cream-themed Nikah. Rinku Rajguru and other industry friends congratulated the couple. Arbaaz was last seen in 'Matka King'.
Web Summary : सैराट में 'सल्या' के नाम से मशहूर अरबाज शेख ने हाल ही में सिमरन के साथ क्रीम-थीम वाले निकाह किया। रिंकू राजगुरु और अन्य उद्योग मित्रों ने जोड़े को बधाई दी। अरबाज आखिरी बार 'मटका किंग' में दिखे थे।