शेअर बाजारामध्ये असे अनेक शेअर्स असतात जे कधी तीव्र घसरणीमुळे गुंतवणूकदारांना घाबरवतात, तर कधी जबरदस्त परतावा देऊन थक्क करतात. असाच एक स्टॉक म्हणजे 'स्पाइस लाउंज फूड वर्क्स' (Spice Lounge Food Works). सोमवारी ५ टक्क्यांच्या अपर सर्किटसह हा शेअर ₹२०.५१ च्या पातळीवर पोहोचला, ज्यामुळे गेल्या ६ दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक लागला. विशेष म्हणजे गेल्या १ आठवड्यात हा शेअर २०% पेक्षा जास्त घसरला होता, परंतु अचानक झालेल्या खरेदीमुळे तो सावरला.
बाजारातील सकारात्मक वातावरणाचाही याला मोठा पाठिंबा मिळाला. बीएसई (BSE) सेन्सेक्स ७०० अंकांपेक्षा जास्त वधारला आणि निफ्टी-५० १% पेक्षा जास्त वाढून २४,२०० च्या पार पोहोचला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातील मजबुतीमुळे या स्टॉकला सपोर्ट मिळाला.
अलीकडील कामगिरी आणि घसरण
जरी आज शेअर वधारला असला, तरी याच्या अलीकडील कामगिरीवर नजर टाकल्यास चित्र फारसं चांगलं चित्र दिसत नाही. गेल्या एका महिन्यात हा शेअर सुमारे २३% नं घसरलाय. तर तीन महिन्यांत यात २८% ची घसरण झाली आहे. २०२६ च्या सुरुवातीपासून आतापर्यंत या शेअरमध्ये ४६% घसरण नोंदवण्यात आली. गेल्या ६ महिन्यांत हा स्टॉक सुमारे ६३% नं घसरलाय, जे यामधील उच्च अस्थिरता दर्शवते.
गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर परतावा
घसरण होऊनही दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा स्टॉक एखाद्या 'मल्टीबॅगर' पेक्षा कमी नाही. गेल्या २ वर्षांत या शेअरनं सुमारे ४००% परतावा दिलाय. ५ वर्षांत हा शेअर १,४००% पेक्षा जास्त वाढला आहे. म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदारानं ५ वर्षांपूर्वी यात १ लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचं मूल्य अनेक पटींनी वाढलं असतं.
शेअरची आजची कामगिरी
आजच्या कामकाजाच्या सत्रात स्पाइस लाउंज फूड वर्क्स लिमिटेडच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. स्टॉक सुमारे ५% च्या उसळीसह ₹२०.५१ वर पोहोचला आणि अपर सर्किटला स्पर्श केला. ट्रेडिंग व्हॉल्यूममध्येही वाढ दिसून आली. स्पाइस लाउंज फूड वर्क्स हा एक स्मॉलकॅप स्टॉक आहे, ज्यामध्ये जोखमीसोबतच मोठ्या परताव्याची शक्यता देखील जोडलेली आहे. अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी बाजाराची चाल आणि कंपनीचे फंडामेंटल समजून घेणे आवश्यक आहे, कारण येथे चढ-उतार वेगाने होतात.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Spice Lounge Food Works surged, hitting the upper circuit after a recent dip. It has delivered a 1400% return in five years, despite recent volatility. Investors should consult experts before investing.
Web Summary : Spice Lounge Food Works में उछाल, हालिया गिरावट के बाद अपर सर्किट पर पहुंचा। पांच वर्षों में 1400% रिटर्न दिया, हालिया अस्थिरता के बावजूद। निवेशकों को निवेश से पहले विशेषज्ञों से परामर्श करना चाहिए।