शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 14:18 IST

Tamil Nadu Election Results 2026 : तामिळनाडूमध्ये थलापती विजयच्या TVK पक्षाची मोठी मुसंडी. विजय यांच्या वडिलांनी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिल्याचा दावा. केरळनंतर तामिळनाडूतही काँग्रेस सत्तेत?

चेन्नई: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी दक्षिण भारताच्या राजकारणाला मोठा धक्का दिला आहे. अभिनेता थलापती विजय याच्या TVK (तमिलगा वेत्री कळघम) पक्षाने पहिल्याच निवडणुकीत १०० हून अधिक जागांवर आघाडी घेत सत्ताधारी द्रमुकला तिसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे. या विजयाच्या लाटेत आता सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे, विजय यांचे वडील आणि प्रसिद्ध दिग्दर्शक एस.ए. चंद्रशेखर यांनी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

काँग्रेससाठी दुसऱ्या राज्यात सत्तेची संधी?केरळमध्ये काँग्रेसप्रणीत UDF ला मिळणारे स्पष्ट बहुमत आणि आता तामिळनाडूमध्ये टीव्हीकेला मिळणारी आघाडी यामुळे काँग्रेससाठी हे 'डबल बोनान्झा' ठरू शकते. तामिळनाडूमध्ये टीव्हीकेला बहुमतासाठी ११७ जागांची गरज भासल्यास काँग्रेस 'किंगमेकर'च्या भूमिकेत येऊ शकते. काँग्रेसने टीव्हीकेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. यावर आता थलापती विजयच्या वडिलांकडून सकारात्मक प्रतिसाद आला आहे.  आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.

स्टॅलिन यांच्या 'इंडिया' आघाडीत फूट?निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि डीएमके 'इंडिया' आघाडीत एकत्र होते. मात्र, मतमोजणीदरम्यान मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन स्वतःच्या मतदारसंघात पिछाडीवर गेल्याने आणि टीव्हीकेने मुसंडी मारल्याने समीकरणे बदलली आहेत. विजय यांच्या वडिलांनी काँग्रेसला दिलेले हे संकेत तामिळनाडूमध्ये 'द्रविडी' राजकारणाचा अंत आणि एका नवीन युगाची सुरुवात असल्याचे मानले जात आहे.

विजय यांच्या घरी जल्लोषटीव्हीकेच्या या अनपेक्षित यशानंतर विजय यांच्या चेन्नईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांनी दिवाळी साजरी करण्यास सुरुवात केली आहे. "तमिळनाडूने परिवर्तनाला कौल दिला आहे," अशी भावना विजय यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. आता काँग्रेस हायकमांड या निमंत्रणावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूElectionनिवडणूक 2026Assembly Election Resultsविधानसभा निवडणूक निकाल २०२६Thalapathy Vijayथलापती विजयcongressकाँग्रेस