शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
2
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
3
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
4
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
5
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
6
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
7
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
8
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
9
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
10
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
11
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
12
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
13
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
14
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
15
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
16
केरळममध्ये भाजपाने खाते उघडले, 'या' मतदारसंघात कमळ फुलले, काँग्रेस, सीपीआयच्या उमेदवारांवर केली मात
17
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
18
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
19
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
20
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 13:33 IST

मुजफ्फरपूरमध्ये फसवणुकीने लग्न करण्याचा प्रयत्न फसला. २०० रुपयांची नोट ओळखता न आल्याने नवरदेवाचा भांडाफोड झाला आणि नवरीने पाठवणी नाकारली.

बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातून फसवणुकीचा एक असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्याची चर्चा आता संपूर्ण राज्यात होत आहे. रात्रभर मंगलाष्टके झाली, विधी पार पडले, पण सकाळी पाठवणीच्य वेळी एका २०० रुपयांच्या नोटेने नवरदेवाचा खोटेपणा उघड केला. आपल्यासोबत फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवरीने सासरी जाण्यास नकार दिला आणि अखेर वरातीला नवरीविनाच रिकाम्या हाताने परतावे लागले.

नक्की काय घडलं?

ही घटना बरियारपूर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात घडली. मनियारी परिसरातून शुक्रवारी रात्री मोठी वरात आली होती. गाणी, नाच आणि उत्साहात लग्नविधी पार पडले. कोणालाही शंका आली नाही की, मांडवात जो मुलगा बसला आहे, तो तो नाहीच आहे ज्याच्याशी मुलीचे लग्न ठरले होते.

एका नोटेने काढला काटा!

शनिवारी सकाळी जेव्हा पाठवणीची वेळ आली, तेव्हा एका महिलेला नवरदेवाच्या वागण्यावर संशय आला. तिने नवरदेवाची परीक्षा घेण्याचे ठरवले. तिने नवरदेवाच्या हातात २०० रुपयांची नोट ठेवली आणि विचारले, "हे किती रुपये आहेत?" नवरदेवाने ती नोट नीट न पाहताच ती '२००० रुपयांची' असल्याचे सांगितले. २०० आणि २००० रुपयांच्या नोटेतला फरकही नवरदेवाला ओळखता येत नाही, हे पाहून महिलांनी आरडाओरडा सुरू केला. जेव्हा लोकांनी नवरदेवाला जवळून पाहिले, तेव्हा कळाले की ज्या मुलाचा साखरपुडा झाला होता, त्याऐवजी दुसराच मुलगा बोहल्यावर बसवला होता.

पोलीस दरबारी पोहोचलं प्रकरण

हा प्रकार उघडकीस येताच नवरीच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त करत विदाई थांबवली. आपली मोठी फसवणूक झाल्याचा आरोप करत मुलीने या नवरदेवासोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला. घटनेची माहिती मिळताच बरियारपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही पक्षांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण नवरी आपल्या निर्णयावर ठाम होती. अखेर, नवरदेवाला आपल्या वरातीसह अपमानित होऊन रिकाम्या हाताने परत जावे लागले. याप्रकरणी पोलिसांनी नवरदेवाकडील एका तरुणाला ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरू आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rupee note reveals groom's fraud, marriage collapses before ceremony's end.

Web Summary : In Bihar, a groom's deceit was exposed by a ₹200 note. He misidentified it, revealing he wasn't who the bride's family believed. The bride refused to leave, and the wedding party returned without her.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश