Lakshmi Mittal Success Story: IPL च्या इतिहासात रविवारी एक मोठा करार करण्यात आला. दिग्गज उद्योजक लक्ष्मी मित्तल आणि त्यांचा मुलगा आदित्य मित्तल यांनी अदर पूनावाला यांच्यासोबत मिळून राजस्थान रॉयल्ससाठी १.६५ अब्ज डॉलर्स म्हणजेच १५,६०० कोटी रुपयांची बोली लावली. मित्तल कुटुंबीयांकडे या टीमचा सर्वाधिक म्हणजेच ७५ टक्के हिस्सा आहे. राजस्थानच्या एका छोट्या ठिकाणाहून बाहेर पडून स्टीक कंपनी उभी करणारे आर्सेलर मित्तल आज अब्जावधींचे मालक आहेत. जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफामध्ये मित्तल समुहाच्या कंपनीच्या स्टीलचा वापर करण्यात आलाय.
लक्ष्मी निवास मित्तल यांचा जन्म १५ जून १९५० रोजी राजस्थानच्या सादुलपुरमधील एका मारवाडी कुटुंबात झाला. त्यांचं बालपण अत्यंत साधेपणात गेलं. त्यांच्या आजोबांनी तयार केलेल्या एका छोट्या घरात कुटुंबातील २० जण वास्तव्यास होते. तिकडे ते काँक्रिटच्या जमिनीवर झोपत. त्यांच्या घरी मातीच्या चुलीवर जेवण बनवलं जात होतं.
अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ
२६ व्या वर्षी परदेश दौरा
१९७६ मध्ये जेव्हा भारतात स्टील उत्पादनावर अनेक निर्बंध होते, तेव्हा २६ वर्षांचे मित्तल इंडोनेशियाला गेले. तिथे त्यांनी 'पीटी इस्पात इंडो' हा आपला पहिला प्लांट स्थापन केला, जो त्यांच्या जागतिक साम्राज्याचा पाया ठरला. तोट्यात चालणाऱ्या स्टील कंपन्या विकत घेऊन त्या फायद्यात आणणं ही मित्तल यांची सर्वात मोठी ओळख राहिली आहे. २००६ मध्ये 'मित्तल स्टील' आणि 'आर्सेलर' यांच्या विलीनीकरणातून 'आर्सेलर मित्तल' ही कंपनी स्थापन झाली, जी आज जागतिक बाजारपेठेतील प्रमुख कंपनी आहे.
अतिशय भव्य आणि शाही जीवनशैली
२००४ मध्ये मित्तल यांनी आपल्या मुलीचं (वनिशा मित्तल) लग्न पॅरिसमध्ये केले होतं, ज्यावर ६० मिलियन डॉलर खर्च झाले होते. त्या काळातील हे जगातील सर्वात महागडं लग्न होतं. लंडनच्या केंसिंग्टन पॅलेस गार्डन्स मधील त्यांचं निवासस्थान जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. असं म्हटलं जाते की, त्यांच्या या महालात त्याच खाणीतील संगमरवर वापरले आहे ज्यातून ताजमहाल बांधला गेला होता.
क्रीडा आणि समाजसेवेतील योगदान
भारतीय खेळाडूंना आर्थिक मदत मिळावी म्हणून त्यांनी ९० लाख डॉलरच्या योगदानासह 'मित्तल चॅम्पियन्स ट्रस्ट' सुरू केला. त्यांनी लंडनच्या ग्रेट ऑरमंड स्ट्रीट हॉस्पिटलला १५ मिलियन पौड्सची देणगी दिली होती, जी त्या काळातील सर्वात मोठी खाजगी देणगी मानली गेली.
स्वित्झर्लंड आता नवं ठिकाण
लक्ष्मी निवास मित्तल ६१.३ अब्ज डॉलर महसूल असलेल्या 'आर्सेलर मित्तल' कंपनीचे अध्यक्ष आहेत. २०२५ मध्ये या कंपनीचा निव्वळ नफा ३.१५ अब्ज डॉलर इतका राहिला, जो २०२४ च्या १.३ अब्ज डॉलरच्या तुलनेत १३५ टक्क्यांनी अधिक आहे. दीर्घकाळ लंडनमध्ये राहिल्यानंतर, तिथल्या नवीन टॅक्स व्यवस्थेला कंटाळून त्यांनी अलीकडेच स्वित्झर्लंडला आपलं नवीन ठिकाण बनवलं.
फोर्ब्सच्या यादीत मोठी झेप
२००५ मध्ये मित्तल फोर्ब्सच्या जागतिक यादीत टॉप-१० मध्ये स्थान मिळवणारे पहिले भारतीय ठरले. एकेकाळी ते जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते. सध्या ते फोर्ब्सच्या यादीत ८३ व्या क्रमांकावर असून त्यांची नेटवर्थ २८.४ अब्ज डॉलर आहे. त्यांना 'स्टील किंग' म्हणूनही ओळखलं जातं.
Web Summary : Lakshmi Mittal, born in Rajasthan, built a steel empire from scratch. He owns 75% of Rajasthan Royals. From sleeping on concrete, he now resides in London’s most expensive house and contributes to philanthropy. Mittal's ArcelorMittal is a global leader, with Mittal recently relocating to Switzerland.
Web Summary : राजस्थान में जन्मे लक्ष्मी मित्तल ने फर्श से स्टील का साम्राज्य बनाया। उनके पास राजस्थान रॉयल्स का 75% स्वामित्व है। कंक्रीट पर सोने से लेकर, अब वे लंदन के सबसे महंगे घर में रहते हैं और परोपकार में योगदान करते हैं। मित्तल की आर्सेलर मित्तल एक वैश्विक नेता है, मित्तल हाल ही में स्विट्जरलैंड चले गए।