1 / 7आज लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. मिळवले असून, मतमोजणीच्या आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये भाजपाने १९० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसची १०० च्या खाली घसरगुंडी उडाली आहे. 2 / 7पश्चिम बंगालमधील याआधीच्या तीन निवडणुकांचा आढावा घेतला तर २०११ साली भाजपाला एकही जागा जिंकता आली नव्हती. तर २०१६ मध्ये खूप जोर लावल्यानंतरही भाजपाला केवळ ३ जागांवर विजय मिळवता आला होता. तर २०२१ मध्ये दोनशेपार मजल मारण्याचे दावे करणाऱ्या भाजपाचं घोडं ७७ जागांवरच अडलं होतं. मात्र यावेळी भाजपानं कमाल केली असून, आतापर्यंतच्या कलांमध्ये भाजपाने १९० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजपाला मिळालेल्या दमदार विजयाची अनेक कारणं समोर येत आहेत. त्यातील प्रमुख कारणं पुढील प्रमाणे आहे.3 / 7२०११ साली माँ, माटी, मानूश यांच्या हिताचं रक्षण करण्याचं आश्वासन देऊन ममता बॅनर्जी सत्तेवर आल्या होत्या. मात्र गेल्या काही वर्षांत ममता बॅनर्जी यांचा एककल्ली कारभार, तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची दंडेलशाही, अपेक्षित विकास करण्यात आलेलं अपयश आणि विशिष्ट्य वर्गाचं लांगूलचालन करत असल्याचे आरोप यामुळे ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसच्या कारभाराबाबत जनतेत तीव्र नाराजी निर्माण झाली होती. तसेच ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील सरकारवर भ्रष्टाचाराचेही अनेक आरोप झाले होते. याउलट भाजपाकडून राज्य आणि केंद्र असं मिळून डबल इंजिनचं सरकार अधिक विकास करू शकतं, असं आश्वासन देण्यात आलं होतं. या सर्वाचा परिणाम म्हणून मतदारांनी नवा पर्याय निवडला आणि भाजपाच्या बाजूने कौल दिला. 4 / 7पश्चिम बंगालमध्ये सुमारे ३० टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. तसेच यातील बहुतांश मतदार हा तृणमुल काँग्रेसचा पाठीराखा आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींकडून या मतदारांच्या कलाने बहुतांश निर्णय होत होते. त्यामधून हिंदूंच्या सणांवर अनेक निर्बंध आणण्यासारखे प्रकार ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केले होते. याशिवाय संदेशखाली प्रकरणामुळेही बंगालमधील हिंदू मतदारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. तसेच भाजपाकडून पश्चिम बंगालमध्ये हिंदूंची होत असेलेली गळजेपी आणि अल्पसंख्याकांचं लांगूलचालन याविरोधात सातत्याने आवाज उठवला जात होता. त्याचा फायदा यावेळी भाजपाचा झाला आणि मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण होऊन हिंदू मतदार हे भाजपाच्या बाजूने उभे राहिले. 5 / 7सलग तीनवेळा बंगालचं नेतृत्व करणाऱ्या ममता बॅनर्जी ह्या मुख्यमंत्री म्हणून पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत्या. त्यामुळेच २०२१ मध्ये जेव्हा भाजपाने पश्चिम बंगालमध्ये जेव्हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा ममता बॅनर्जींनी त्याला बंगाली विरुद्ध बाहेरचे असे रूप दिले. मात्र यावेळी भाजपाने शुभेंदू अधिकारी यांच्या रूपात प्रभावी प्रभावी चेहरा समोर आणला होता. तसेच भाजपा सत्तेत आल्यास बिगर बंगाली मुख्यमंत्री होईल हा ममता बॅनर्जींचा दावा खोडून काढला होता. त्याचा फायदा या निकालांमध्ये भाजपाला होताना दिसत आहे. 6 / 7ममता बॅनर्जींच्या रूपात पश्चिम बंगालमध्ये महिलेच्या हातात नेतृत्व असलं तरी गेल्या काही वर्षांत पश्चिम बंगालमध्ये महिलंवर अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्यात आर.जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे देशव्यापी संतापाची लाट उसळली होती. याचा भाजपाने पुरेपूर राजकीय फायदा उठवत ममता बॅनर्जींविरोधात रान उठवले होते. तसेच या बलात्कार कांडातील पीडितेच्या आईला उमेदवादी देत सहानुभूतीचा फायदाही मिळवला होता. त्यामुळे महिला सुरक्षितचेच्या मुद्द्यावर बंगालमधील मतदार मोठ्या प्रमाणात भाजपाकडे वळले. 7 / 7गेल्या काही काळात पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने एसआयआरची प्रक्रिया कठोरपणे राबवली होती. त्यावरून मोठा वाद झाला होता. तसेच तृणमूल काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली पार पडलेल्या एसआयआर प्रक्रियेंतर्गत मृत, स्थलांतरित आणि बोगस असे मिळून ९० लाख जणांची नावं मतदारयादीतून वगळण्यात आली होती. याचा जबर फटका तृणमूल काँग्रेसचा बसल्याचे तर फायदा भाजपाला झाल्याचे दिसून आले आहे आहे.