शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Top Marathi News LIVE Updates: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 05:09 IST

कौल कुणाला? सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी

नवी दिल्ली/कोलकाता : देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल साेमवारी जाहीर होणार आहे. आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुदुचेरी या पाच राज्यांमध्ये मतमोजणीची जय्यत तयारी पूर्ण झाली असून, सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारपर्यंत सत्तेचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता असून, कोणाला कौल मिळणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध

सर्व राज्यांमध्ये पश्चिम बंगालच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. येथे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये अतिशय अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. बंगालमधील २९४ पैकी २९३ जागांचा निकाल उद्या लागणार असून,

‘फालटा’ या एका जागेसाठी पुन्हा मतदान होणार असल्याने त्याचा निकाल २४ मे रोजी जाहीर केला जाणार आहे. तामिळनाडूमध्येही डीएमके आघाडी आणि टीव्हीके यांच्यात जोरदार संघर्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बारामती, राहुरीसह ८ ठिकाणी काय होणार?

कर्नाटक, नागालँड, गुजरात आणि महाराष्ट्रातील आठ जागांवरील पोटनिवडणुकांचे निकालही सोमवारीच जाहीर होणार आहेत. महाराष्ट्रातील बारामती, राहुरी येथे सुनेत्रा पवार तर राहुरीच्या जागेवर शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले निवडणूक रिंगणात आहेत. त्यांचा फैसलाही सोमवारीच लागणार आहे.

सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पाचही राज्यांमध्ये व केंद्रशासित प्रदेशात कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रांच्या बाहेर निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे.

पक्षांचे कार्यकर्ते व समर्थकांमध्ये निकालाची उत्सुकता असून, विजयी मिरवणुकांवर निवडणूक आयोगाने काही निर्बंध घातले आहेत.

कोणत्या राज्यात कोणाची सत्ता, एक्झिट पोल काय सांगतात?

राज्य   जागा   बहुमत  सध्या सत्तेत     एग्झिट पोल काय सांगतात?

प. बंगाल       २९४    १४८    तृणमूल भाजप सत्तेत, तृणमूलचीही काही अंशी शक्यता

तामिळनाडू      २३४    ११८    डीएमके+       डीएमकेचे वर्चस्व, टीव्हीके गेमचेंजर ठरणार

केरळ   १४०    ७१     एलडीएफ+      काँग्रेसच्या नेतृत्वातील यूडीएफला सत्तेची संधी

आसाम  १२६    ६४     भाजप+ भाजप आघाडी हॅट्-ट्रिक करत पुन्हा सत्तेत येणार

पुद्दुचेरी ३०     १६     एनडीए  एआयएनआरसीसह भाजप आघाडी सत्ता राखणार

English
हिंदी सारांश
Web Title : Crucial verdict today for five states; eyes on Bengal, Tamil Nadu.

Web Summary : Results for assembly elections in Assam, Kerala, Tamil Nadu, West Bengal, and Puducherry will be declared today. All eyes are on West Bengal. Potency elections results of eight seats in Karnataka, Nagaland, Gujarat and Maharashtra will also be declared today.
टॅग्स :Electionनिवडणूक 2026Result Dayपरिणाम दिवस