04 May, 26 09:05 AM
राहुरी पोटनिवडणुकीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर
महाराष्ट्रातील राहुरी पोटनिवडणुकीत भाजपाचे अक्षय कर्डिले ४२६६ मतांनी आघाडीवर आहेत. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. तिथे भाजपाचे अक्षय कर्डिले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे यांच्यात लढत होत आहे.
04 May, 26 09:00 AM
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत
पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या तासाभरात आलेल्या कलांमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत दिसून येत आहे. तसेच सध्याच्या आकडेवारीनुसार २०९ जागांचे कल समोर आले असून, त्यात भाजपाने १०३ तर तृणमूल काँग्रेसने १०३ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस २ आणि इतर पक्ष हे १ जागेवार आघाडीवर आहेत.
04 May, 26 08:29 AM
राहुरी विधानसभा मतदारसंघातील टपाली मतांच्या मतमोजणीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर
अहिल्यानगरमधील राहुरी विधानसभा मतदारसंघातील टपाली मतांच्या मतमोजणीत भाजपाचे अक्षय कर्डिले यांनी आघाडी घेतली आहे.
04 May, 26 08:26 AM
५ राज्यांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू, सुरुवातीचे कल हाती
आसाममध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा ७ जागांवर पुढे, पश्चिम बंगालमध्ये २ जागांवर टीएमसीने तर ३ जागांवर भाजपाने आघाडी घेतली. सकाळी ८ वाजल्यापासून ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. आसाममध्ये काँग्रेसदेखील ५ जागांवर आघाडीवर आहे. केरळमध्ये यूडीएफ २ जागांवर तर एलडीएफ १ जागेवर पुढे आहे.
04 May, 26 07:50 AM
कोलकाता येथे मतमोजणी केंद्राबाहेर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त
पश्चिम बंगालमधील २९३ विधानसभा जागांसाठी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. निकालाच्या पार्श्वभूमीवर कोलकाता येथील नेताजी इनडोअर स्टेडियमबाहेरील 'स्ट्रॉंग रूम' परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
04 May, 26 07:44 AM
केरळमध्ये आमचा विजय होईल, प्रदेशाध्यक्ष जोसेफ यांनी व्यक्त केला विश्वास
केरळच्या निकालाबाबत आम्ही पूर्ण आशावादी आहोत. नक्कीच आमचा विजय होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे निकाल लागले त्याचीच पुनरावृत्ती यावेळीही होईल. जागांच्या संख्येबाबत आता अंदाज लावू शकत नाही मात्र आमच्या विजयाची खात्री आहे असा विश्वास केरळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सनी जोसेफ यांनी व्यक्त केला.
04 May, 26 07:40 AM
सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी, आसाममध्ये प्रशासन सज्ज
आसाममधील जोरहाट मतमोजणी केंद्राबाहेरील दृश्य, सकाळी ८ वाजल्यापासून १२६ जागांसाठी होणार मतमोजणी, प्रशासनाने सर्व प्रक्रिया केली पूर्ण