पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. प्रचारादरम्यान, राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये अटीतटीची लढत दिसून आली होती. त्यामुळे बंगालमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून, मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या तासाभरात आलेल्या कलांमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत दिसून येत आहे. तसेच सध्याच्या आकडेवारीनुसार २०९ जागांचे कल समोर आले असून, त्यात भाजपाने १०३ तर तृणमूल काँग्रेसने १०३ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस २ आणि इतर पक्ष हे १ जागेवार आघाडीवर आहेत.
पश्चिम बंगालमधील मतदान आटोपल्यानंतर समोर आलेल्या बहुतांश एक्झिट पोलमधून राज्यात सत्तांतर होण्याची संकेत देण्यात आले होते. तसेच त्यातील अनेक एक्झिट पोलमधून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल आणि स्पष्ट बहुमत मिळवेल, असा दावा करण्यात आला होता. मात्र काही एक्झिट पोलमधून मात्र राज्यात तृणमूल काँग्रेसची सत्ता कायम राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या २९४ पैकी २९३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान झाले होते. येथे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये अटीतटीची लढत झाल्याने तसेच दोन्ही टप्प्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाल्याने निकाल काय लागणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
Web Summary : West Bengal vote counting shows a close fight between TMC and BJP. Early trends indicate a neck-and-neck race, defying some exit poll predictions. High voter turnout fuels anticipation for the final results of the 293 seats.
Web Summary : पश्चिम बंगाल में मतगणना में टीएमसी और भाजपा के बीच कड़ी टक्कर। शुरुआती रुझान बराबरी की दौड़ दिखाते हैं, कुछ एग्जिट पोल की भविष्यवाणियों को नकारते हैं। 293 सीटों के अंतिम परिणामों के लिए उच्च मतदान उत्सुकता बढ़ाता है।