नवी दिल्ली : बेंगळुरूस्थित ‘गॅलेक्सआय’ या स्पेस स्टार्टअपचा ‘मिशन दृष्टी’ उपग्रह रविवारी कॅलिफोर्निया येथून स्पेसएक्सच्या ‘फाल्कन ९’ रॉकेटद्वारे यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला. हा केवळ एक उपग्रह नसून, जगातील पहिला ‘ऑप्टोसॉर’ उपग्रह आहे, जो दिवसा-रात्री आणि कोणत्याही हवामानात पृथ्वीची अचूक छायाचित्रे टिपण्यास सक्षम आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
‘ऑप्टोसॉर’ म्हणजे काय?
काही उपग्रहांमध्ये मर्यादा असतात, पण ‘दृष्टी’ उपग्रहाने दोन भिन्न तंत्रज्ञान एकत्र आणली आहेत.
इलेक्ट्रो-ऑप्टिकल सेन्सर्स : हे मानवी डोळ्यांप्रमाणे काम करतात व सूर्यप्रकाशात स्पष्ट व रंगीत फोटो देतात.
सिंथेटिक अपर्चर रडार सेन्सर्स : हे ढग, पाऊस, धुके किंवा अगदी रात्रीच्या गडद अंधारातही रडार लहरींच्या मदतीने जमिनीची अचूक माहिती मिळवतात.
या दोन्ही प्रणाली एकाच उपग्रहात असणे, ही जागतिक स्तरावरील पहिलीच घटना आहे, ज्यामुळे डेटा संकलन अधिक विश्वासार्ह झाले आहे.
हा उपग्रह म्हणजे भारताच्या तरुण पिढीची नवकल्पना आणि राष्ट्र उभारणीप्रती असलेली जिद्द व समर्पणाचे एक जिवंत उदाहरण आहे.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
या उपग्रहाचे फायदे
संरक्षण : सीमेवर, समुद्र हालचालींवर २४ तास नजर ठेवण्यासाठी.
आपत्ती व्यवस्थापन : चक्रीवादळ किंवा पावसाळ्यात जमिनीवरील स्थितीचा आढावा घेण्यासाठी.
शेती आणि पायाभूत सुविधा : पिक आरोग्य, बांधकाम नियोजन.
Web Summary : Indian startup GalaxEye launched 'Drishti,' an all-weather imaging satellite, via SpaceX. This 'Optosor' satellite provides 24/7 surveillance for defense, disaster management, and infrastructure, marking a significant technological advancement and a boost to national security.
Web Summary : भारतीय स्टार्टअप गैलेक्सीई ने स्पेसएक्स के माध्यम से 'दृष्टि' लॉन्च किया, जो एक सर्व-मौसम इमेजिंग उपग्रह है। यह 'ऑप्टोसोर' उपग्रह रक्षा, आपदा प्रबंधन और बुनियादी ढांचे के लिए 24/7 निगरानी प्रदान करता है, जो एक महत्वपूर्ण तकनीकी उन्नति और राष्ट्रीय सुरक्षा को बढ़ावा देता है।