शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 23:08 IST

फलोदी सट्टाबाजाराच्या ताज्या संकेतांनुसार पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणूका अत्यंत चुरशीच्या झाल्याचे चित्र आहे. पुढे आलेल्या आकडेवारीनुसार मुख्यमंत्री ममता बनर्जी यांना धक्का बसण्याची आणि भाजपाची सरशी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  

नरेश डोंगरे -

नागपूर : देशातील चार राज्याच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल अवघ्या काही तासात लागणार आहेत. हे निकाल 'कॅश' करण्यासाठी भारतातील ठिकठिकाणच्या सट्टा बाजारासह अमेरिकेच्या सट्टा बाजारानेही जोरदार डावबाजी चालविली आहे. विशेष म्हणजे, बहुचर्चित फलोदी, दिल्ली, मुंबईसह सट्टा बाजारासह अमेरिकेच्या पॉलीमार्केटमध्येही प. बंगालमधील निवडणूकीची धूम आहे. सटोेड्यांच्या मते चार पैकी सर्वाधिक सट्टा बंगाल विधानसभेच्या निवडणुकांवर लागला आहे.

भारतात बहुतांश प्रांतात त्या-त्या ठिकाणचे सट्टा बाजार फेमस असले तरी सर्वाधिक विश्वासू आणि लोकप्रिय सट्टाबाजार म्हणून फलोदीचे (राजस्थान) येते. या सट्टा बाजारातील आकडे अचूक असल्याने लाखो सटोडे या आकड्यांवर विश्वास ठेवून लगवाडी-खयवाडी करतात. चार राज्याच्या विधानसभांच्या निवडणूकांवर कोट्यवधींच्या सट्ट्याची खयवाडी करण्यासाठी दिल्ली, मुंबई, इंदोर आणि नागपूरसह ठिकठिकाणच्या बुकींनी दुकान सजविले आहे. सोबतच यावेळी अमेरिकन ऑनलाइन प्रेडिक्शन प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन सट्ट्याची जबरदस्त चलती असल्याचे सटोडे सांगतात. 

फलोदी सट्टाबाजाराच्या ताज्या संकेतांनुसार पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणूका अत्यंत चुरशीच्या झाल्याचे चित्र आहे. पुढे आलेल्या आकडेवारीनुसार मुख्यमंत्री ममता बनर्जी यांना धक्का बसण्याची आणि भाजपाची सरशी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  

सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार भारतीय जनता पक्ष १४५ ते १५० जागांपर्यंत -सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार भारतीय जनता पक्ष १४५ ते १५० जागांपर्यंत आणि तृणमूल काँग्रेस १४० ते १४४ मजल मारू शकतो. अर्थात, येथे हे दोनच पक्ष सत्तेची चावी मिळवू शकतात आणि उर्वरित काँग्रेस, सीपीएम आणि अन्य पक्ष सट्टा बाजाराने नगन्य ठरविले आहे. या आकड्यांमुळे पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराच्या शक्यतांवर जास्त भर दिला जात आहे.

पॉलीमार्केटमध्ये बंगाल -पश्चिम बंगाल निवडणुकीची अमेरिकेतील ऑनलाइन प्रेडिक्शन प्लॅटफॉर्म पाोलिमार्केटवर, अर्थात या अमेरिक सट्टा बाजारात मोठी धूम आहे. या निवडणुकीच्या निकालांवर सुमारे ४.८ मिलियन डॉलर्सचा सट्टा लावला गेल्याचे सांगितले जात आहे.

भारतीय जनता पक्षाला सुमारे ५६ टक्के समर्थनासह भक्कम आघाडी -येथील सध्याच्या ट्रेंडनुसार भारतीय जनता पक्ष सुमारे ५६ टक्के समर्थनासह भक्कम आघाडी घेताना दिसून येत आहे. तर, तृणमूल काँग्रेस ४३ टक्के जागांच्या अवतीभवती असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, या फलाटावरील सट्टेबाजीतही काँग्रेससह अन्य पक्षाला स्थान नसल्याचे चित्र आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Election Bets Surge: Bengal Hot Pick in Global Betting Markets

Web Summary : Assembly election results fuel betting frenzy in India and the US. Bengal elections draw maximum bets, with a tight race between BJP and TMC. Falodi market hints at BJP gaining ground, potentially challenging Mamata Banerjee's rule. Online platforms show BJP leading.
टॅग्स :Electionनिवडणूक 2026west bengalपश्चिम बंगाल