शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
4
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
8
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
9
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
10
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
11
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
12
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
13
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
14
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
15
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
16
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
17
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
18
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
19
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
20
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 16:15 IST

Maharashtra Weather Update Today: उन्हाच्या झळा आणि उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवसांत वातावरण बदलणार असून, काही भागांमध्ये पाऊस कोसळणार आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

एप्रिलपाठोपाठ मे महिन्याच्या सुरूवातीलाही उष्णतेच्या लाटेने सगळ्यांचा घाम काढला. पण, पुढील काही दिवसांत अंगाची लाहीलाही करणाऱ्या उकाड्यातून सुटका होऊ शकते. हो, हवामान विभागाने राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात वेगवान वारे, विजांच्या कडकडाटास पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

सोमवारी म्हणजे ४ मे रोजी विदर्भात काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, नागपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांत मध्यम पाऊस होण्याचा अंदाज असून, यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज असून, हवामान विभागाने या चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्टही जारी केला आहे. ५ मे रोजीही विदर्भात पाऊस होण्याचा अंदाज आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट दिला गेला आहे.   

कोकण, मराठवाड्यातही पाऊसाचा अंदाज

बुधवारी (६ मे) पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही जिल्ह्यात खबरदारी घेण्याचा इशारा दिला गेला आहे. 

त्याचबरोबर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील धाराशिव, लातूर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

७ मे रोजीही पश्चिम विदर्भातील जिल्हे, मराठवाड्यातील बीड, धाराशिव आणि लातूर; तसेच पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट दिला गेला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Weather: Heatwave Relief Expected, Four Districts on Orange Alert

Web Summary : Maharashtra anticipates relief from the heatwave with predicted rainfall. Vidarbha, Marathwada, and Konkan are expected to receive rain with thunderstorms. Four Vidarbha districts are under an orange alert for heavy rainfall, while other regions are under a yellow alert for moderate showers.
टॅग्स :weatherहवामान अंदाजMaharashtraमहाराष्ट्रRainपाऊसthunderstormवादळ