1 / 11दक्षिण कोरिया हा देश आपल्या जीवनशैलीसाठी आणि नाईट लाईफसाठी जगप्रसिद्ध आहे. मात्र, याच झगमगाटाच्या मागे एक भयंकर वास्तव आहे ते म्हणजे येथील तरुण पिढी झोपेच्या समस्येचा सामना करत आहे. (फोटो - Reuters)2 / 11ही समस्या अधोरेखित करण्यासाठी आणि लोकांना थोडी विश्रांती मिळावी यासाठी सियोल मेट्रोपॉलिटन गव्हर्नमेंटने शनिवारी एका 'पावर नॅप कॉन्टेस्ट' (Power Nap Contest) चे आयोजन केलं होतं. (फोटो - Reuters)3 / 11या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हजारो तरुण-तरुणी पार्कमध्ये जमले होते. तसेच सहभागी होण्यासाठी काही मजेशीर अटी देखील ठेवण्यात आल्या होत्या. 4 / 11स्पर्धक थकलेला असावा आणि त्याने पोटभर जेवून यावं अशी अट होती. तसेच 'स्लीपिंग ब्युटी' किंवा 'स्लीपिंग प्रिन्स' सारखे कपडे घालून येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. (फोटो - AP)5 / 11स्पर्धेत अनेकजण भन्नाट वेशभूषा करून आले होते. २० वर्षीय विद्यार्थी पार्क जून-सिओक हा जोसियन राजवंशाच्या सम्राटाचा रेशमी पोशाख घालून आला होता. (फोटो - AP) 6 / 11'परिक्षेची तयारी आणि पार्ट-टाइम जॉबमुळे मला दिवसातून फक्त तीन-चार तास झोप मिळते. एक राजा कसा झोपतो, हे दाखवण्यासाठी मी येथे आलो आहे' असे त्याने सांगितले. (फोटो - Reuters)7 / 11निद्रानाशाने त्रस्त असलेल्या २४ वर्षीय शिक्षिका यू मी-योन या 'कोआला'चा पेहराव करून आल्या होत्या, जेणेकरून त्यांना शांत झोप घेता येईल. (फोटो - AP)8 / 11दक्षिण कोरिया हा OECD देशांमध्ये सर्वाधिक काम करणारा आणि सर्वात कमी झोपेचा आनंद घेणारा देश मानला जातो. येथील लोक जगात सर्वात कमी तास झोपतात. (फोटो - AP) 9 / 11याच गंभीर समस्येकडे जगाचं लक्ष वेधण्यासाठी सरकारने या स्पर्धेचे आयोजन केलं होतं. दुपारी ३ वाजता स्पर्धा सुरू झाली आणि डोळ्यांवर मास्क लावताच संपूर्ण पार्कमध्ये शांतता पसरली. (फोटो - AP)10 / 11स्पर्धक किती गाढ आणि शांत झोपले आहेत, हे तपासण्यासाठी अधिकारी त्यांचा हार्ट रेट चेक करत होते. या अनोख्या स्पर्धेत एका ८० वर्षीय वृद्धाने प्रथम क्रमांक पटकावला. (फोटो - AP)11 / 11३७ वर्षीय ऑफिस कर्मचारी ह्वांग डू-सॉन्ग दुसऱ्या स्थानावर होते. ह्वांग म्हणाले की, 'नाईट शिफ्ट आणि ड्रायव्हिंगमुळे मी खूप थकलो होतो. नदीकाठी वाहणाऱ्या थंड हवेत स्वतःला रिचार्ज करण्यासाठी मी येथे आलो होतो.' (फोटो - Reuters)