शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
7
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
8
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
9
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
10
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
11
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
12
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
13
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
14
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
15
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
16
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
17
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
18
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
19
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
20
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
Daily Top 2Weekly Top 5

"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 14:55 IST

उत्तर प्रदेशातील मेरठमधून एक अशी धक्कादायक घटना समोर आली आहे, जी ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.

उत्तर प्रदेशातील मेरठमधून एक अशी धक्कादायक घटना समोर आली आहे, जी ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. एका व्यक्तीने खून केल्यानंतर स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मृतदेहाजवळ बसून रडण्याचा बनाव केला. त्याचं ओरडणं आणि रडणं पाहून कोणालाही वाटलं असतं की, खुनी दुसराच कोणीतरी आहे आणि या पतीला आपल्या पत्नीच्या जाण्याचं प्रचंड दुःख झालं आहे. जेव्हा आरोपी पती ढसाढसा रडत होता, तेव्हा तो हजारो लोकांच्या गर्दीने वेढलेला होता. आपले गुपित उघड होईल, याची त्याला जराही भीती वाटत नव्हती. मात्र सहा वर्षाच्या मुलीनेच त्याचा पर्दाफाश केला.

मेरठच्या लिसाडी गेट पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मजीद नगरमध्ये झालेल्या कौशर हत्याकांडाने परिसरात खळबळ उडवून दिली. ही हत्या अत्यंत निर्दयीपणे करण्यात आली होती. घटनास्थळावर पडलेला मृतदेह आणि रक्ताचे डाग पाहून प्रत्येकाचा थरकाप उडाला. घरात तीन मुली रडत होत्या, घटनास्थळी शेकडो लोकांची गर्दी होती आणि चहूबाजूला पोलिसांनी नाकाबंदी केली होती. आता प्रश्न असा होता की, कौशरची हत्या नक्की कोणी आणि का केली? 

ढसाढसा रडू लागला

ज्यावेळी कौशरची हत्या झाली, तेव्हा पती शाकिब बाजारात गेल्याचं सांगण्यात येत होतं. तो ई-रिक्षा चालवतो. शाकिब जेव्हा घरी पोहोचला, तेव्हा घराबाहेरची गर्दी पाहून तो घाबरल्याचे नाटक करू लागला. पत्नीचा मृतदेह पाहताच त्याने जोरात हंबरडा फोडला. तो ढसाढसा रडू लागला, ते पाहून तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या डोळ्यांतही पाणी आलं. ज्या घरात शाकिब भाड्याने राहत होता, तिथल्या लोकांनी आणि नातेवाईकांनी त्याला सावरलं. या हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला होता.

एक क्लू मिळाला अन्...

या प्रकरणाच्या तपासात मेरठचे एसपी सिटी विनायक गोपाळ भोसले यांची एंट्री झाली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांनी पाहंले की, शाकिबच्या दोन मुली शांत बसून रडत होत्या. तेव्हा एसपी सिटी स्वतः जमिनीवर त्या मुलींजवळ बसले. त्यांनी मुलींना जवळ घेतलं आणि त्यांच्याशी लहान मुलांसारख्या गप्पा मारल्या. हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावरही खूप व्हायरल झाले. 'पोलिसांमधील इतका मोठा अधिकारी जमिनीवर बसून मुलींचं दुःख कसं वाटून घेत आहे', असं म्हणत लोकांनी त्यांचं कौतुक केले. पण विनायक गोपाळ भोसले यांना तिथूनच एक असा क्लू मिळाला जो खुन्यापर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसा होता.

 शाकिबने पेपर कटरने पत्नी कौशरची केली हत्या

यानंतर अचानक घटनेला एक नवीन वळण मिळालं. हा खुनी दुसरा कोणी नसून कौशरचा पती शाकिबच निघाला. तो कौशरच्या मृतदेहाजवळ मुद्दाम अश्रू ढाळत होता, पण त्याच खोट्या अश्रूंनी या खुनाचा पर्दाफाश केला. शाकिबने पेपर कटरने पत्नी कौशरचा गळा चिरून हत्या केली होती. शाकिबचे दुसऱ्या एका महिलेशी अवैध संबंध होते आणि कौशर त्याला विरोध करायची, याच कारणावरून त्याने हा गुन्हा केला.

शिडीवरून चोर आला

एसपी सिटी विनायक भोसले यांनी सांगितलं की, शाकिबने जेव्हा पत्नीची हत्या केली, तेव्हा त्याच्या दोन्ही मुलींनी ते पाहिलं होतं. शाकिबने त्यांना धमकावलं होतं की, "कोणी विचारलं तर सांगायचं की शिडीवरून चोर आला होता आणि अम्मीला मारून गेला." जेव्हा दोन्ही मुलींनी एसपींना हेच उत्तर दिलं, तेव्हा त्यांच्या मनात शंका आली. त्यानंतर त्यांनी दोन महिला पोलीस अधिकाऱ्यांना त्या मुलींसोबत सोडलं. 

"पप्पांनीच मम्मीला मारलं"

या महिला पोलिसांनी काही वेळ मुलींशी कुटुंबियांसारखा संवाद साधला. त्यानंतर पुन्हा जेव्हा विचारलं की 'अम्मीला कोणी मारले?', तेव्हा मुलींनी सत्य सांगितलं. त्या म्हणाल्या, "पप्पांनीच मम्मीला मारलं. आम्ही सकाळी उठलो तेव्हा पप्पाच मम्मीजवळ होते आणि ते गेल्यानंतर मम्मीच्या शरीरातून रक्त येत होते. पप्पांनी सांगितलं होतं की कोणी विचारलं तर सांगायचं 'चोर' आला होता." येथूनच सर्व चित्र स्पष्ट झालं आणि पती शाकिबला अटक करण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Daughter Exposes Father: Husband Wept by Wife's Body After Murder

Web Summary : In Uttar Pradesh, a man feigned grief after murdering his wife. His six-year-old daughter revealed he killed her mother, exposing his lies and leading to his arrest. He blamed a thief.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू