1 / 5शिर्डीतील साईबाबा मंदिर हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. हा परिसर भक्तांनी कायमच भरलेला असतो. साईचरणी लीन होऊन भक्तांना वेगळेच आत्मिक समाधान लाभते.2 / 5रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनीही नुकतेच शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि मंदिरात होणाऱ्या विधींमध्ये सहभाग नोंदवला.3 / 5नीता अंबानी या पारंपरिक वेषात श्री साईबाबा समाधी मंदिरात आल्या होत्या. त्यांनी मनोभावे पूजा-अर्चना केली आणि साईंच्या चरणी लीन होत त्यांचा आशीर्वाद घेतला. 4 / 5साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी नीता अंबानी यांचे स्वागत केले आणि त्यांना श्री साईबाबांची मूर्ती देऊन सन्मानित केले.5 / 5नीता अंबानी अनेकदा धार्मिक स्थळांना भेटी देत असतात. त्यांच्या शिर्डी भेटीतही साईबाबांप्रती असलेली त्यांची प्रगाढ श्रद्धा दिसून आली. (सर्व फोटो सौजन्य- श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी)