शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 05:33 IST

क्रिप्टोसारखे डिजिटल चलन, धार्मिक किंवा चॅरिटेबल देणग्या, इराण दूतावासामध्ये केलेल्या पेमेंटवरही बंदी

दुबई : इराणच्या ताब्यात असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवासासाठी इराणला टोल देणाऱ्या जहाज कंपन्यांना अमेरिकेने कडक इशारा दिला आहे. अशा कंपन्यांवर अमेरिकेचे निर्बंध लादले जाऊ शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अमेरिकेच्या 'ऑफिस ऑफ फॉरेन अॅसेट्स कंट्रोल' (ओएफएसी) ने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या या सूचनेनुसार इराणकडून मागितले जाणारे हे शुल्क केवळ रोख स्वरूपातच नाही, तर इतर मार्गानी दिल्यासही कारवाई होईल. यात डिजिटल मालमत्ता (क्रिप्टो), मालमत्ता अदलाबदल, धार्मिक, चॅरिटेबल देणग्या, इराणी दूतावासांमध्ये केलेले पेमेंट आदींचा समावेश करण्यात आला आहे.

नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल

इराण सरकारकडून सुरक्षित प्रवासाची हमी मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारे पैसे देणे किंवा तशी मागणी करणे हे अमेरिकी नागरिक आणि अन्य देशांच्या व्यक्तींसाठी निर्बंधांना निमंत्रण देणारे ठरेल. पेमेंटची पद्धत कोणतीही असो, हा धोका कायम राहील, असे ओएफएसीने म्हटले आहे.

आजपर्यंत ४५ टँकर माघारी

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या माहितीनुसार, इराणची नाकेबंदी सुरू झाल्यापासून आतापर्यंत ४५ व्यापारी जहाजांना माघारी धाडण्यात आले आहे. अमेरिकेच्या नौदलाने १३ एप्रिलपासून इराणची नाकेबंदी केली आहे. यामुळे इराणचा एकही तेल टैंकर होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून शकलेला नाही. त्याने इराणचा तेल महसूल थांबला आहे.

फ्लोरिडातील एका कार्यक्रमात शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्युबावर मिश्किलपणे टीका केली.

'घरी जाता जाता क्युबाला पण धडा शिकवून जाऊ'

वॉशिंग्टन : इराणमधील मोहीम आटोपून परतताना अमेरिकेच १ नौदल क्युबाचा प्रश्नही निकाली काढेल, अशी मिश्किल टिप्पणी ट्रम्प यांनी केली. पाम बीचेस येथील 'फोरम क्लब' या संस्थेसमोर भाषण करताना ट्रम्प यांनी क्युबाचा उल्लेख केला.

भाषणात विषयांतर करत ते म्हणाले की, इराणवरून परतताना आम्ही कदाचित 'यूएसएस अब्राहम लिंकन' हे महाकाय जहाज तिथे पाठवू. हे जहाज क्युबाच्या किनाऱ्यापासून १०० यार्ड अंतरावर उभे राहील आणि ते पाहून क्युबाचे नागरिक, आम्हाला खूप खूप धन्यवाद देत, आम्ही शरणागती पत्करण्यास तयार असल्याचे सांगतील, असे ट्रम्प म्हणाले.

अमेरिका जर्मनीतून ५,००० सैन्य मागे घेणार

वॉशिंग्टनः येत्या ६ ते १२ महिन्यांत अमेरिका जर्मनीतून आपले सुमारे ५,००० सैन्य मागे घेणार असल्याची घोषणा पेंटागॉनने शुक्रवारी केली.इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या मुद्द्यावरून जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झा आणि ट्रम्प यांच्यात झालेल्या वादानंतर ट्रम्प यांनी आपली धमकी प्रत्यक्षात आणली आहे.

इराणच्या नेतृत्वाकडून अमेरिकेचा अपमान केला जात असल्याची तसेच धोरणशून्यतेवरही मर्झ यांनी ताशेरे ओढले होते.

ट्रम्प यांनी फेटाळला इराणचा नवा प्रस्ताव

ट्रम्प यांनी युद्ध संपवण्यासाठी इराणने दिलेला ताजा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, त्यांना समझोता करायचा आहे, पण मी त्या प्रस्तावावर समाधानी नाही.

त्यामुळे पुढे काय होते ते पाहू. तेथील नेतृत्व कमकुवत आहे; त्यांना करार करायचा आहे, पण त्यांची सर्व व्यवस्था ढासळलेली आहे. दरम्यान, इराणच्या 'इर्ना' या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, इराणने आपला प्रस्ताव गुरुवारी रात्री पाकमधील मध्यस्थांकडे सुपूर्द केला होता.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराण