Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)

प्राइज टॅगचं ओझं हलकं झालं; कार्तिक शर्मानं दाखवली धमक

By सुशांत जाधव | Updated: May 3, 2026 00:39 IST

Open in App

IPL 2026 CSK vs MI Kartik Sharma Maiden IPL Fifty Gun Celebration : चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने आयपीएलच्या मिनी लिलावात ज्या अनकॅप्ड भारतीय खेळाडूवर इतिहासातील सर्वात मोठी बोली लावली, त्याच्या बॅटमधून मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात IPL मधील पहिले अर्धशतक आले. कार्तिक शर्माने चौकार मारत संघाचा विजयही निश्चित केला. त्यानंतर त्याने बॅटला बंदूक करत 'गन सेलिब्रेशन'सह मॅच विनिंग अर्धशतकी खेळीचा आनंद व्यक्त केला. सोशल मीडियावर त्याच्या सेलिब्रेशनची तुफान चर्चा रंगताना दिसत आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

यंदाच्या हंगामात तो प्राइज टॅगमुळे चर्चेत राहिला

आयपीएलच्या मिनी लिलावात चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने कार्तिक शर्मासाठी १४.२० कोटी एवढी मोठी रक्कम मोजली होती. त्याच्यासह प्रशांत वीरलाही एवढ्याच रक्कमेसह चेन्नई सुपर किंग्सने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. हे दोघेही आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे अनकॅप्ड खेळाडू आहेत. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्सविरुद्धच्या चेपॉकच्या मैदानातील सामन्यात पहिल्यांदाच दोघांनाही संधी मिळाली. IPL च्या यंदाच्या हंगामाला सुरुवात झाल्यावर प्राइज टॅगमुळे ही जोडी चर्चेत राहिली. कार्तिक शर्माला फलंदाजीतील धमक दाखवता आली नव्हती. पाच सामन्यात तो धावांसाठी संघर्ष करताना दिसला. पण सहाव्या सामन्यात नाबाद अर्धशतकासह त्याने आयुष म्हात्रेची उणीव भरून काढण्यासाठी अन्य कोणाकडे पाहण्याची गरज नाही, अशी हमी देणारी खेळी केली.

नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील

आता मॅच विनिंग अर्धशतकासह 'गन सेलिब्रेशन'सह वेधलं लक्ष

कार्तिक शर्मानं राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. या सामन्यात त्याने १५ चेंडूत १८ धावा केल्या होत्या. पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वुरुद्धच्या सामन्यात तो अनुक्रमे १ आणि ६ धावांवर बाद झाला. याआधीच्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातही तो खेळला. पण वानखेडेच्या मैदानातही तो १८ धावांवर अडखळला. गुजरात टायटन्स विरुद्ध ९ चेंडूत १५ धावांवर आटोपल्यावर तो प्राइज टॅगमुळे दबावात असल्याची चर्चा रंगली होती. आता या चर्चेला ब्रेक लागला असून त्याने मॅच विनिंग अर्धशतकी खेळीनंतर केलेले 'गन सेलिब्रेशन' चर्चेत आला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : CSK's costliest uncapped player hits first IPL fifty, celebration goes viral.

Web Summary : Kartik Sharma, CSK's most expensive uncapped buy, scored his maiden IPL fifty against MI. His 'gun celebration' after the winning shot is trending. Sharma, under pressure due to his price tag, proved his worth with the match-winning innings.
टॅग्स :आयपीएल २०२६चेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्सऋतुराज गायकवाडहार्दिक पांड्या