शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 06:40 IST

होर्मुझ हे आंतरराष्ट्रीय जलव्यापार क्षेत्रातील एक मुख्य 'चोकपॉईंट' (कोंडीचे ठिकाण) मानले जाते. सामान्यतः येथून दररोज सुमारे २० दशलक्ष बॅरल कच्चे तेल, पेट्रोलियम उत्पादने, तसेच जगातील एकूण एलएनजी निर्यातीचा पाचवा हिस्सा वाहून नेला जातो.

होर्मुझ हे आंतरराष्ट्रीय जलव्यापार क्षेत्रातील एक मुख्य 'चोकपॉईंट' (कोंडीचे ठिकाण) मानले जाते. सामान्यतः येथून दररोज सुमारे २० दशलक्ष बॅरल कच्चे तेल, पेट्रोलियम उत्पादने, तसेच जगातील एकूण एलएनजी निर्यातीचा पाचवा हिस्सा वाहून नेला जातो. जगातील एक तृतीयांश हेलिअम व खतासाठी वापरले जाणारे तेवढेच युरियादेखील याच मार्गावरून जाते. होर्मुझला पर्याय शोधण्याचे प्रकल्प अनेक दशकांपासून कागदावर आहेत, मात्र आता पहिल्यांदाच या पर्यायांची खरी कसोटी लागत आहे.

नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल

सौदी अरेबियाची 'पेट्रोलाइन'

सौदी अरेबिया सध्या जगातील सर्वात महत्त्वाची पाइपलाइन सौदी अरेबियातून जाणारी 'ईस्ट-वेस्ट पाइपलाइन' (ज्याला 'पेट्रोलाइन' असेही म्हणतात) ही आहे. १९८० च्या दशकात मूळ 'टँकर युद्धा' (इराक-इराण युद्धात तेल टँकरवर हल्ले केले जात असत) दरम्यान ही बांधली गेली होती. २०१९ मध्ये याची क्षमता ७ दशलक्ष बॅरलपर्यंत होती.

मर्यादा : सौदी अरेबियाला लागून लाल समुद्रावरील यानबू या ठिकाणी लोडिंग टर्मिनल्स वेगाने तेल वाहून नेण्यासाठी तयार केलेले नाहीत. त्यामुळे सध्या या पाइपलाइनमधून तिच्या क्षमतेपेक्षा कमी तेलवाहतूक सुरू आहे.युरोपचा प्रश्न : यानबूहून युरोपला जाणारे तेल इजिप्तमधील सुमेद पाइपलाइनमधून जावे लागते, ज्याची क्षमता २.५ दशलक्ष बॅरल प्रतिदिन आहे.

सं. अरब अमिरातीची 'अॅडकॉप'

यूएई दुसरा महत्त्वाचा पर्याय अबु धाबीची कच्चे तेल वाहून नेणारी पाइपलाइन आहे, जी हबशान ते फुजैराह(ओमानच्या आखाताजवळ) जाते.वैशिष्ट्य : आखाती देशांतून थेट हिंदी महासागरात बाहेर पडणारा हा एकमेव मार्ग आहे.

धोका : इराणने मार्च महिन्यात फुजैराहवर ड्रोन हल्ले करून येथील साठवणूक टाक्यांना लक्ष्य केले होते, ज्यामुळे लोडिंग थांबवावे लागले.

इराक : युद्धापूर्वी इराकचे ३.४ दशलक्ष बॅरल तेल प्रामुख्याने बसरा बंदर आणि होर्मुझमधून जात असे. उत्तरेकडील तुर्कीयेला जोडणारी पाइपलाइन सप्टेंबर २०२५ मध्ये पुन्हा सुरू झाली असली, तरी त्यातून होणारी वाहतूक इराकच्या एकूण नुकसानीच्या तुलनेत नगण्य आहे.

कुवेत : यांची अवस्था सर्वात वाईट आहे. त्यांचे दररोजचे २ दशलक्ष बॅरल तेल केवळ होर्मुझमधूनच जाते. कुवेतकडे कोणताही पाइपलाइन पर्याय नाही. कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरशनने एप्रिलमध्ये सांगितले की, होर्मुझ मार्ग उघडला तरी तातडीने ते पुरवठा करू शकणार नाहीत.

कतार : कतारची मुख्य ताकद एलएनजी आहे. जगाला १९% एलएनजी पुरवणारा कतार पूर्णपणे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अवलंबून आहे.इराणचा स्वतःचा पर्याय : विशेष म्हणजे, इराणने स्वतःसाठी १००० किमी लांबीची पाइपलाइन (गोरेह ते जास्क) बांधली आहे. मात्र, निर्बंध आणि अपूर्ण कामामुळे ती केवळ नावापुरतीच सुरू आहे.

निष्कर्ष : आखातात अधिक पाइपलाइन असाव्यात ही मागणी समजण्यासारखी आहे, पण होर्मुझला पर्याय उभा करण्यासाठी शेकडो अब्ज डॉलर व दशकांचा वेळ लागेल. शिवाय, नव्या पाइपलाइन आणि टर्मिनल्सदेखील ड्रोन हल्ल्यांपासून सुरक्षित असतीलच याची कसलीही शाश्वती नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Hormuz Alternatives: World's Lifeline Choked by Iran's Threat?

Web Summary : Hormuz Strait, a vital oil route, faces threats. Alternatives like Saudi's Petroline and UAE's pipeline exist, but have limitations and vulnerabilities. Building secure replacements requires vast investment and time.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराण